नाशिकमध्ये दोन लाखांचे चोरीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 09:31 PM2018-02-13T21:31:51+5:302018-02-13T21:32:41+5:30
नाशिक : वडाळा गावातील दोन संशयितांकडून भद्रकाली पोलिसांनी सारडा सर्कल परिसरात दोन लाख रुपयांचे चोरीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य मंगळवारी (दि़१३) जप्त केले़ या साहित्यामध्ये सुमारे दीड लाख रुपयांच्या टेम्पोचाही समावेश आहे़
नाशिक : वडाळा गावातील दोन संशयितांकडून भद्रकाली पोलिसांनी सारडा सर्कल परिसरात दोन लाख रुपयांचे चोरीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य मंगळवारी (दि़१३) जप्त केले़ या साहित्यामध्ये सुमारे दीड लाख रुपयांच्या टेम्पोचाही समावेश आहे़
भद्रकाली पोलीस ठाण्याचे हद्दीत चोरीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ यांना मिळाली होती़ त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सारडा सर्कल परिसरात सापळा लावण्यात आला होता़
हॉटेल डिलक्ससमोर संशयित टॅम्पो (एमएच ०४, ईबी २७७४) येताच भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार सोमनाथ सातपुते, रियाज शेख, पोलीस नाईक राजेंद्र काळोगे, प्रविण पगारे, मन्सूर शेख, मिलिंद परदेशी, पोलीस शिपाई संतोष उशिर यांनी टेम्पोतील संशयित इब्राहिम नसरोद्दीन शेख (३०,रा़ रेहमतनगर, वडाळा गाव, नाशिक), रेहान शकूर शेख (२८, रा़ रेहमतनगर, वडाळा गाव, नाशिक) या दोघांना ताब्यात घेऊन टेम्पोतील मालाबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़
पोलिसांनी फिडर केबल, आॅप्टीकल केबल, बेस्ट प्लेट, टाईपलेक्सर मशिन, फिटींग बॉक्स, ३० किलो ताब्यांची तार, पुंगळ्या,केबल व टेम्पो असा २ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या दोघांही संशयितांना अटक केली आहे़या दोघांकडून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता निरीक्षक सूर्यंवशी यांनी वर्तविली आहे़