नाशिकमध्ये दरोड्याच्या तयारीतील दोघा संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 10:17 PM2018-06-06T22:17:58+5:302018-06-06T22:17:58+5:30

नाशिक : टाकळी रोडवरील सारंग हॉटेल व सहदेव बंगल्याच्या आडोशाला लपून बसलेल्या व दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाचपैकी दोघा संशयितांना भद्रकाली पोलिसांनी बुधवारी (दि़६) पहाटे अटक केली़ आरिफ ऊर्फ तेल्या माजीद शेख (२५, रा़ किस्मतबाग कब्रस्तान) व मुजफ्फर ऊर्फ सर्किट रज्जाक शेख (२८, रा़ रसूलबाग कब्रस्तान, भद्रकाली) अशी या दोघा संशयितांची नावे असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़

Nashik,Two,suspects,arrested,robbery | नाशिकमध्ये दरोड्याच्या तयारीतील दोघा संशयितांना अटक

नाशिकमध्ये दरोड्याच्या तयारीतील दोघा संशयितांना अटक

Next
ठळक मुद्दे ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी

नाशिक : टाकळी रोडवरील सारंग हॉटेल व सहदेव बंगल्याच्या आडोशाला लपून बसलेल्या व दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाचपैकी दोघा संशयितांना भद्रकाली पोलिसांनी बुधवारी (दि़६) पहाटे अटक केली़ आरिफ ऊर्फ तेल्या माजीद शेख (२५, रा़ किस्मतबाग कब्रस्तान) व मुजफ्फर ऊर्फ सर्किट रज्जाक शेख (२८, रा़ रसूलबाग कब्रस्तान, भद्रकाली) अशी या दोघा संशयितांची नावे असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़

भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार दरोडा टाकण्याच्या तयारीत पाच संशयित असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विशाल गिरी, पोलीस हवालदार सोमनाथ सातपुते प्रवीण पगारे, उत्तम पाटील, दीपक शिलावट, गणेश निंबाळकर, संतोष उशीर यांनी टाकळीरोड परिसरात धाव घेऊन सहदेव बंगल्याच्या आडोशाला लपलेले संशयित आरिफ ऊर्फ तेल्या माजीद शेख व मुजफ्फर ऊर्फ सर्किट रज्जाक शेख या दोघांना पाठलाग करून पकडले़ तर त्यांचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले़

पोलिसांनी तेल्या व सर्किट या दोघांकडून लाकडी दांडका, कोयता, बॅटरी, हातोडी, पिवळ्या रंगाची वायर जप्त केली असून, त्यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात दरोडापूर्व तयारीचा गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेल्या उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे़

Web Title: Nashik,Two,suspects,arrested,robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.