आरोग्य विज्ञान विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 05:41 PM2018-05-15T17:41:23+5:302018-05-15T17:41:23+5:30
नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण पोलिसांनी उधळून लावल्यानंतर दुसºया दिवशी आंदोलनकर्ते पुन्हा त्याच जागेवर येऊन बसले आहेत. पोलिसांनी काल आंदेलनकर्त्यांचा मंडप जप्त केल्यामुळे आंदोलनकर्ते भर उन्हातान्हात उपोषण करीत असल्याने त्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीच सुमारे आठ कर्मचाºयांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून आता भर उन्हात आंदोलन सुरू झाल्याने आंदोलनाचे गांभिर्य अधिकच वाढले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून समान काम समान दाम या मागणीसाठी आंदोलन पुकारलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाºयांनी १ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पंधरा दिवस झाले असून अत्तापर्यंत आठ कर्मचाºयांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. असे असतांनाही विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतेही चर्चा अथवा सकारात्मक पाऊल उचलले जात नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांचा मंडप काढून उपोषणकर्त्यांना हटविण्याचे आदेश पोलिसांना दिल्याने पोलिसांनी सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आंदोलन उधळून लावले. काही आंदोलनकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्यांचे पिण्याच्या पाण्याचे जारही पोलिसांनी जप्त केले. विशेष म्हणजे संघटनेचे नेते उपस्थित नसतांना पोलिसांनी उपोषणकर्त्यांवर बळाचा वापर करीत त्यांना पोलीस ठाण्यात आणले.
मात्र दुसºया दिवशी उपोषणकर्त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमो उपोषण सुरू केले असून भरऊन्हातान्हात उपोषण करण्यात आले असून आंदोलनकर्त्यांच्या जीवाला काही धोका झाल्यास प्रशासन त्यास जबाबदार राहील अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.
दरम्यान, उपोषणकर्त्यांच्या कठोर भूमिकेमुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विद्यापीठ प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.