शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती अपलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 07:20 PM2019-06-06T19:20:02+5:302019-06-06T19:20:48+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या यंदाही आॅनलाईन करण्यात येणार असून गुरूवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिखाऱ्यांनी जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त ...

nashik,upload,information,about,teacher,vacancies | शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती अपलोड

शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती अपलोड

googlenewsNext
ठळक मुद्देआजपासून आॅनलाईन अर्ज: लॉगिनद्वारे माहितीला अंतिम स्वरूप


नाशिक: जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या यंदाही आॅनलाईन करण्यात येणार असून गुरूवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिखाऱ्यांनी जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या माहितीला अंतिम स्वरूप दिले. त्यामुळे सायंकाळी ६ वाजेनंतर बदलीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीही शिक्षकांच्या आॅनलाईनबल्या करण्यात येणार असून रिक्त पदे आणि समानिकरणनुसार रिक्त पदांच्या आधारे ही प्रक्रिया करण्यात येणार आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संकेतस्थळावर भरलेल्या माहितीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी अंतिम स्वरूप दिले असून सायंकाळी ६ वाजता ही प्रक्रिया पुर्ण करण्यात आली.
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आॅनलाइन बदल्यांबाबत आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या हस्ते संकेतस्थळावर लॉगिन करु न माहिती अंतिम करण्यात आली. ६ ते १० जुन या कालावधीत शिक्षकांना आॅनलाईन बदल्यांसाठी माहिती सादर करावयाची आहे. दरम्यान, बदल्यांसाठी अंतराचे प्रमाण म्हणून परिवहन महामंडळाचा दाखला मान्य करणार नसून खोटी माहिती सादर करणा-यांवर कारवाई करणार असल्याची माहिती डॉ. नरेश गिते यांनी दिली.
शिक्षण बदल्यांबाबत २३ मे पासून संकेतस्थळावर माहिती भरण्यात येत आहे. सर्व १५ तालुक्यांचे १०० टक्के शिक्षकांचे संकेतस्थळावर मॅपिंग करण्यात आले असून गुरुवारी (दि.६) सदरची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत अंतिम करण्यता आली आहे. गट शिक्षण अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर प्रक्रि या घेण्यात आली. यावेळी डॉ. गिते यांनी २०१८ मध्ये शिक्षक बदल्यांबाबत झालेल्या तक्र ारींची दखल घेत यावर्षी आपण स्वत: संवर्ग १ व संवर्ग २ मधील बदली प्रक्रि येवर लक्ष ठेवून शिक्षकांनी बदलीसाठी खोटी कागदपत्र सादर केल्यास व भरलेली माहिती खोटी असल्यास व त्यामुळे बदल्यांमध्ये प्रश्न निर्माण झाल्यास संबंधीत्तावर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

Web Title: nashik,upload,information,about,teacher,vacancies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.