वडाळागावातील संशयिताकडून गावठी कट्टा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 10:37 PM2018-03-27T22:37:33+5:302018-03-27T22:37:33+5:30
नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून वडाळागावच्या रामोशी गल्लीतील एका संशयिताकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत़ गुलाम आयुब पठाण (२८, रा. भारत गॅस गोडावूनशेजारील झोपडपट्टी, वडाळागाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे़

सोमवारी (दि़२६) रात्रीच्या सुमारास युनिट एकच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना वडाळागावातील रामोशी गल्लीत एक इसम गावठी कट्ट विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर, संतोष कोरडे, विशाल काठे, आसिफ तांबोळी, विशाल देवरे यांनी सापळा रचला़ रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांनी संशयित गुलाम पठाण याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले़ त्याची कसून चौकशी व अंगझडती घेतल्यानंतर त्याच्या कमरेच्या डाव्या बाजूस गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे आढळून आली़
गुन्हे शाखेने संशयित गुलाम पठाण याच्याकडून ३१ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त केली़ या प्रकरणी संशयित पठाण याच्या विरोधात इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़