जलसंवर्धनाची बीजे समाजात रूजावी- दिघावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 06:21 PM2019-03-22T18:21:11+5:302019-03-22T18:23:39+5:30

पंचवटी : दिवसेंदिवस भीषण पाणी टंचाई होत आहे अशावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन जल व्यवस्थापन विषयावर भित्तीचित्रे, घोषवाक्य सुभाषितांच्या माधमातून ...

nashik,water,conservation,business,society,dugavkar | जलसंवर्धनाची बीजे समाजात रूजावी- दिघावकर

जलसंवर्धनाची बीजे समाजात रूजावी- दिघावकर

googlenewsNext

पंचवटी : दिवसेंदिवस भीषण पाणी टंचाई होत आहे अशावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन जल व्यवस्थापन विषयावर भित्तीचित्रे, घोषवाक्य सुभाषितांच्या माधमातून चांगल्या प्रकारे जनजागृती केली आहे. जलसंर्धनाची ही मोहिम केवळ विद्यार्थ्यांपुरती मर्यादीत न रहाता समाजात जलसाक्षरता पोहचणे आणि रुजणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिघावकर यांनी केले.
महात्मा गांधी विदयामंदिर संचालित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात भूगोल विभागातर्फे २२ मार्च दिवस आंतरराष्ट्रीय जलिदन म्हणून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी दिघावकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक आबा देवरे, भूगोल विभागप्रमुख, उपप्राचार्य डॉ. अरुण पाटील, कला व वाणज्यि शाखा प्रमुख डॉ. विनीत रिकबे उपस्थित होते. भूगोल विषय विभागप्रमुख डॉ. प्रल्हाद व्याळीज यांनी प्रास्ताविक केले. यावेळी देवरे, पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
भूगोल विभागामार्फत ११ ते १३ मार्च दरम्यान जलव्यवस्थापन विषयावर तीन दिवशीय भित्तीचित्र प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनात महाविद्यालयाचे २७० विद्यार्थी सहभाग झाले होते. जलव्यवस्थापन, जलसंवर्धन तसेच पाण्याचे विविध स्त्रोत व त्यांचे जतन यावर विद्यार्थ्यांनी भित्तीचित्रे, घोषवाक्य व सुभाषिते तयार केली होती. प्रदर्शन शेवटच्या दिवशी निवड समिती मार्फत उत्कृष्ट प्रथम, द्वितीय, तृतीय भित्तीचित्रांची निवड करण्यात आली.
प्रथम क्र मांक हेमराज मिसाळ, यज्ञेश्वर जाधव द्वितीय, तर तृतीय क्र मांक सुमित्रा गावित तसेच भारती पवार व निवृत्ती वाघ यांना उत्तेजनार्थ भेटवस्तू प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. प्रा. डी. व्ही. सोनावणे, प्रा. पी. बी. दाते यांनी निवड समतिीवर काम केले. सूत्रसंचालन दाते यांनी तर आभार प्रा. जी. यु. हरकर यांनी मानले.

Web Title: nashik,water,conservation,business,society,dugavkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.