पाच दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 07:32 PM2019-05-06T19:32:35+5:302019-05-06T19:33:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क: सिडको : महापालिका सिडको पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे सिडकोतील औदुंबर स्टॉप परिसरातील एन-८ सेक्टरमध्ये गेल्या पाच ...

nashik,water,supply,break,up,for,five,days | पाच दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित

पाच दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क:
सिडको : महापालिका सिडको पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे सिडकोतील औदुंबर स्टॉप परिसरातील एन-८ सेक्टरमध्ये गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठाच झालेला नाही, तर काही ठिकाणी गढूळ आणि मातीमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ मनपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या पाच दिवसांपासून येथील नागरिकांना पाण्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.
मागील पाच ते सहा दिवसांपासून याठिकाणी पाइपलाइनचे काम करण्यासाठी खड्डा खोदण्यात आल्याने याठिकाणी ड्रेनेज व पाण्याची पाइपलाइन एकत्र झाली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. औंदुबर स्टॉप परिसरातील एन-८ सेक्टर भागात गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अनेक दिवसांपासून याठिकाणी पाइपलाइनचे काम करण्यासाठी खड्डा खोदून ठेवला असल्यानेच याठिकाणचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे.
सोमवारी या परिसरातील काही भागात पाणीपुरवठा झाला असला तरी अक्षरश: गढूळ पाण्याचा पुरवठा झाला आहे. ऐन उन्हाळ्यात या भागात पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत महानगरपालिकेकडे तक्र ार करूनही उपयोग झाला नाही. पाणीपुरवठा विभागाकडूनच याठिकाणी खोदण्यात आलेल्या या खड्ड्यामुळेच पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन एकत्र झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना करून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत व स्वच्छ करावा, अशी मागणी परिसरातील राजू खांडेकर, दिलीप परदेशी, वसंत कोठावदे, पवन साळी, दिनेश सोनवणे, मंगेश जाट, मंगेश माली, सुनंदा कोठावदे, पूजा कुलकर्णी, रु पाली देवरे, शारदा जपूर, शालिनी दुसाने, भारती खानडेकर, वर्षा सारडा यांनी केली आहे.

Web Title: nashik,water,supply,break,up,for,five,days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.