नाशिक, नगरला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 02:05 PM2019-04-08T14:05:46+5:302019-04-08T14:07:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिकरोड : उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढू लागला असून पाण्याची टंचाई देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने नाशिक ...

nashik,water,supply,through,nashik,nagar,tanker | नाशिक, नगरला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

नाशिक, नगरला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देजळगावात २१० विहरी अधिगृहितधुळ्यात १८ गावांमध्ये टॅँकर


लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढू लागला असून पाण्याची टंचाई देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने नाशिक विभागातील ३७६ गावे, २९९६ वाड्यातील १७ लाख लोकांसाठी ९६५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पाण्याची गरज भागविण्यासाठी ३८५ गावातील विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. विभागात सर्वाधिक जास्त नगर जिल्ह्यात व त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून नंदुरबार जिल्ह्याला अजूनपर्यंत टॅँकरची गरज भासलेली नाही.
यंदाच्या वर्षी सरासरी पेक्षा पाऊस कमी झाल्याने राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून गावखेड्यांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी विभागात आत्तापासून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून नगर जिल्ह्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेली आहे.
उन्हाळा सुरू होऊन दोन महिनेच झाले असून अजून एप्रिल, मे महिना बाकी आहे. नाशिक विभागातील अनेक गावे व वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने टॅँकरद्वारे व विहिरी अधिग्रहण करून पाण्याची तहान भागविली जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील १६४ गावे, ४९७ वाड्यांमध्ये १८४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच ४१ गावातील विहीरी देखील अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर टॅँकरमध्ये पाणी भरण्यासाठी ३९ विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या असून ४ लाख ३ हजार नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.

धुळे जिल्ह्यातील १८ गावांत १५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून ८० गावांसाठी विहीरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर टॅँकरसाठी १५ विहीर अधिग्रहण करण्यात आले असून ४३ हजार लोकसंख्येला पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात अद्यापपर्यंत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व विहीर अधिग्रहण करण्याची गरज भासलेली नाही.


जळगांव जिल्ह्यातील ११० गावांमध्ये ९१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून २१० गावांतील विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर टॅँकरसाठी ३ विहीर अधिग्रहीत करण्यात आल्या असून २ लाख २६ हजार लोकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील ४४४ गावे २ हजार ४९९ वाड्यांमध्ये ६७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ५४ गावांसाठी विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून टॅँकरकरिता ४० विहीर अधिग्रहीत केल्या आहेत. नाशिक विभागात पाण्याची गरज भागविण्यासाठी ७३६ गावे, २९९६ वाड्यांमध्ये ९६५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ३८५ गावासाठी विहीर व ९७ विहिरी टॅँकरमध्ये पाणी भरण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. विभागातील १७ लाख लोकांसाठी याद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.

Web Title: nashik,water,supply,through,nashik,nagar,tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.