परतीच्या निवृत्तीनाथ पालखीचे होणार स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:00 PM2018-08-08T16:00:03+5:302018-08-08T16:08:59+5:30
नाशिक : आषाढी एकादशीनिमित्ताने त्र्यंबकेश्वरहून निघणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे शहरात जल्लोषात स्वागत केले जाते. महापालिकेच्यावतीने हारतुरे आणि चहापाण्याची व्यवस्था होते तर राजकीय नेत्यांकडून देखील पालखीतील वारकºयांचा सत्कार केला जातो. परंतु परतीच्या पालखीकडे फारसे कुणीचेही लक्ष नसते. शहरातील राष्टÑीय भोलेनाथ भजनी मंडळाने ही उणीव भरून काढत पालखी आणि वारकºयांप्रती आपली भावना व्यक्त केली आहे.
जूने नाशिक पररिसरातील राष्टÑीय भोलेनाथ भजनी मंडळाने गेल्या तीन वर्षांपासून परतीच्या पालखी सोहळ्यातील वारकºयांचा सत्कार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कोणताही गाजावाजा न करता आपल्या आर्थिक कुवतीनुसार सदर मंडळाकडून फुल ना फुलाची पाकळी देऊन वारकºयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. अगदी पाच ते दहा मिनिटांचा हा कार्यक्रम कुणाच्याही नजरेत भरणारा नसला तरी भजनी मंडळाकडून परतीच्या पालखीची आवर्जून आठवण केली जाते.
त्र्यंबकेश्वरहून पालखी निघते तेंव्ह पंढरपूरपर्यंत लाखो भाविक श्री निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यात सहभागी होतात. परतीच्या प्रवासात वारकरी अपापल्या गावी निघून घातात. त्र्यंबकेश्वर पर्यंत अवघे दोन अडीच हजार वारकरी त्र्यंबकेश्वरी परतात. या वारकºयांचे गडकरी चौकातील शासकीय गोडाऊन शेजारील छोट्याशा मोकळ्या जागेत स्वागत केले जाते. टाळ, पखवाज, वीणा, श्रीस्वामी समर्थ बॅन्ड, सनई पार्टी अशा वारकºयांचा भजनी मंडळ सत्कार करते. येत्या १२ रोजी परतीच्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे स्वागत केले जाणार आहे.
या सोहळ्याच्या स्वागत समितीत राष्टÑीय भोलेनाथ भजनी मंडळ, श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, कॉलेज कॅम्पस फ्रेन्ड सर्कल, विठ्ठल रूक्मिणी मंदिर चव्हाटा, श्री स्वामी समर्थ मंदिर कुंभारवाडा, संत गाडगे महाराज दत्त मंदिर, महिला भजनी मंडळ, हभप सोनू विनोद सोनवणे, रेखा प्रल्हाद सोनवणे, अश्विनी सारंग सोनवणे, विनोद सोनवणे, दिलीप बिडवई, अनंत बिडवई, अविनाश कडवे, लक्ष्मण बोरसे यांचे सहकार्य लाभले आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थित राहाण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष रघुनाथसिंह परदेशी यांनी केले आहे.
कोट--
ही एक सामाजिक जबाबदारी
त्र्यंबकेश्वरहून पालखी निघाल्यानंतर ज्याप्रमाणे सोहळा होतो तसा सोहळा परतीला होणे अपेक्षित आहे. पंढरपूरही आलेल्या वारकºयांचे तर विशेष स्वागत होणे अपेक्षित आहे. कुणी तरी काहीतरी करेल यापेक्षा आपणच यासाठी पुढाकार घेऊन छोटेखानी कार्यक्रम सुरू केला आहे. नाशिककरांचे सहकार्य अपेक्षित आहेत.
- रघुनाथसिंह परदेशी, संस्थापक अध्यक्ष, राष्टÑीय भोलेनाथ भजनी मंडळ.