परिपूर्ण ऊर्जा धोरण कुणाच्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 04:11 PM2018-11-24T16:11:03+5:302018-11-24T16:12:31+5:30

नाशिक : थकबाकीमुळे वाकलेल्या महावितरण कंपनीचा कणा ताठ करण्यासाठी महावितरणने कागदोपत्री असंख्य सुदृढ योजना आखल्या आहेत.

nashik,whose,energy,policy,dependent,wind | परिपूर्ण ऊर्जा धोरण कुणाच्या भरवशावर

परिपूर्ण ऊर्जा धोरण कुणाच्या भरवशावर

googlenewsNext
ठळक मुद्दे ग्राहकांपर्यंत योजनांची पुरेशी माहितीच नाही

नाशिक : थकबाकीमुळे वाकलेल्या महावितरण कंपनीचा कणा ताठ करण्यासाठी महावितरणने कागदोपत्री असंख्य सुदृढ योजना आखल्या आहेत. वारंंवार ज्यांना चोर आणि शिरजोर म्हणून संबोधण्यात आले त्याच ग्राहकांच्या भरवशावर महावितरणचे धोरण बेतलेले असताना ग्राहकांपर्यंत योजनांची पुरेशी माहितीच पोहचली नसेल तर मग महावितरणचे संभाव्य ऊर्जा संवर्धन धोरण परिपूर्ण होणार कसे हा खरा प्रश्न आहे.
राज्याला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण आणि परिपूर्ण करण्यासाठी महावितरणकडून अनेक उपाययोजनांची जंत्री आखण्यात आली आहे. यातील बहुतांश योजनांचे आकडे जाहीर झाले आणि वादातही सापडले. त्याबाबत महावितरणने स्पष्टीकरण देण्याला महत्त्व दिले नाही तो भाग वेगळा, परंतु जर ग्राहकांच्या सहकार्याने योजना राबवायच्या असतील तर त्या घटकाला सामावून घेण्यासाठी व्यापक कार्यक्रम अपेक्षित आहे. त्याकडे मात्र फारसे लक्ष देण्यात आले नसल्याचे प्रकर्षाने जाणवते.
शेतकऱ्यांसाठीच्या सौर ऊर्जेबाबत पहिल्या टप्प्यात काही शेतकºयांना सौर पॅनल देण्यात आले, मात्र महावितरणने या संदर्भात दिलेल्या आकडेवारीचा घोळ संशयात आहे. ऊर्जा संवर्धन योजनेसाठी शालेय विद्यार्थ्यांना सामावून घेण्याबाबत पुढे काय झाले हेही कळलेले नाही, याबरोबरच बीएसस्सी अभ्यासक्रमाचाही विषय कुठवर आलाय हेही समोर येऊ शकलेले नाही. वितरण आणि तांत्रिक हानी कमी करण्यासाठीचा विशेष कार्यक्रम राबविणार कसा याचीही स्पष्टता नसल्याने परिपूर्ण ऊर्जा धोरण कुणाच्या भरवशावर राबविणार हे तरी स्पष्ट व्हावे.

Web Title: nashik,whose,energy,policy,dependent,wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.