स्वच्छता मोहिमेतही ‘थर्ड पार्टी’ हवी कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 06:34 PM2019-02-11T18:34:24+5:302019-02-11T18:35:33+5:30

नाशिक : सांडपाणी नियोजन, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन, पाणी स्वच्छता आणि आरोग्य यांचा समन्वय साधून गावाला स्वच्छ करण्यासाठी तिसऱ्याच कुणीतरी ...

nashik,why,should, 'third party',in,the,cleanliness,campaign? | स्वच्छता मोहिमेतही ‘थर्ड पार्टी’ हवी कशाला?

स्वच्छता मोहिमेतही ‘थर्ड पार्टी’ हवी कशाला?

Next

नाशिक : सांडपाणी नियोजन, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन, पाणी स्वच्छता आणि आरोग्य यांचा समन्वय साधून गावाला स्वच्छ करण्यासाठी तिसऱ्याच कुणीतरी येऊन आपल्या गावाला धडे द्यावेत हे कुणालाही आवडणार नाही. त्यातच जिल्हा परिषदसारखी मजबूत यंत्रणा अशा त्रयस्थाच्या (एजंट) माध्यमातून ग्रामपंचायतींना स्वच्छ करणार असेल तर मग अशा व्यवस्थेला आपोआपच मान्यताही मिळते. महाराष्टÑात लोकसहभागातून स्वच्छ आणि सुंदर गाव निर्माण करणाºया हिरवेबाजार, राळेगणसिद्धी आणि औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा या गावांनी राज्यात आपला ठसा उमटविला आहे. पाटोदा गावाची महती, तर थेट राष्टÑपतींपर्यंत पोहचली आहे. या गावांंच्या पावलावर पाऊल ठेवत राज्यातील जवळपास २५ तरी गावे अशी आहेत की त्यांनी लोकसहभागूत गावाचा शाश्वत विकास केला आहे. माणसाला माणसे जोडून विकासाची नवी परिभाषा निर्माण केलेली आहे. राज्यातच अशा गावांचा आदर्श असताना जिल्हा परिषद मात्र गावात राबविण्यात येणाºया कोणत्याही योजनेसाठी ‘थर्ड पार्टी’ एजंटच्या भरवशावर का आहे याचा मात्र उलगडा होत नाही. पाणी स्वच्छ असो की शौचालय, आरोग्य यंत्रणा असोत की शिक्षण यामध्ये एखासी संस्था काय सुचविणार. वर्षानुवर्ष जिल्हा परिषद योजना रोबविण्याबरोबरच तळागाळापर्यंत पोहचलेली असताना नव्याने या एजंट म्हणून कंपन्या कुठून उगवल्या हे मात्र उमगत नाही.
गोदाकाठावरील गावे स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त होण्याबरोबरच गोदावरीही कशी प्रदूषणमुक्त राहिली याचे नियोजन खासगी कंपन्यांकडे सोपविले जाणार आहे म्हणे. म्हणजे वर्षानुवर्ष जिल्हा परिषदा नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याबरोबरच गावाच्या विकासाठी नियोजनात्मक आणि योजनात्मक काम करीत असताना अलीकडे मात्र खासगी कंपन्या अशा प्रकारची भूमिका बजावत आहेत. म्हणजे गावाची पाहणी करून या कंपन्या ठरविणार की गावाच्या विकासासाठी काय करावे आणि किती निधी लागेल. खरेतर खात्यातच इतकी अनुभवी माणसे आणि जिल्ह्याची स्वतंत्र यंत्रणा असतांना कुण्या तिसºयाने का म्हणून विकासाची वाट दाखवावी. खरेतर कागदोपत्री कतीही सुंदर रांगोळ्या काढल्या तरी प्रत्यक्षात तेथील भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक रचनेवर विकासाचा बराचसा भाग अवलंबून असतो. केवळ ठोकताळा येथे लागू पडत नाही. तसे असते तर राज्यातील आदर्श गावे ही एजंटांच्या कामगिरीवरच ठरली असती.
लोकसहभागातून लोकचळवळी उभ्या राहिल्या आहेत. यातून अनेक कामे घडून आली आहेत. नियोजन करण्यापेक्षा प्रत्यक्षातील कामांनी अनेक गावांनी देशात आदर्श निर्माण केला आहे. गावकºयांनी ठरविले तर काहीही होऊ शकते. ‘काय करील ‘राव’, जे करील गाव’ असे ग्रामीण भागात म्हटले जाते ते उगाच नाही. एखादी व्यक्ती किंवा संस्था काहीही करू शकत नाही. लोकभावना आणि लोकांची मानसिकता तितकीच महत्त्वाची असते. कोणत्याही मध्यस्थाविना
लोकसहभागीतून अशाप्रकारचे रचनात्मक काम होऊ शकते हे महाराष्टÑाने पाण्याच्या मोहिमेतून पाहिले आहेच.

Web Title: nashik,why,should, 'third party',in,the,cleanliness,campaign?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.