ओझरच्या महिलेची फसवणूक करणाºया नायजेरीयनास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 04:55 PM2017-07-26T16:55:15+5:302017-07-26T16:56:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पुर्नविवाहासाठी शादीक़ॉम या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या ओझर येथील महिलेची सुमारे पावणेदोन लाखांची फसवणूक करणाºया नायजेरीयन नागरिकास ग्रेटर नोयडा व महाराष्ट्र पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई करून सोमवारी (दि़२४) रात्री अटक केली आहे़ किंग्जले चिबूकेम (३२,रा़लंडन मूळ रा़नायजेरीया) असे या संशयिताचे नाव असून त्याच्यावर ओझर पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कविता फकिरा पाटील (३२, यमुनानगर, ओझर) यांचे ब्युटी पार्लर असून त्यांनी पुर्नविवाहासाठी शादीक़ॉम या संकेतस्थळावर नोंदणी केली होती़ संशयित मिचेल सोसन क्रेग (३२,रा़नायजेरीया) या बनावट नावाच्या व्यक्तीने पाटील यांच्याशी संपर्क साधून मी लंडन येथील रहिवासी असून एका प्रतिष्ठित कंपनीत अधिकारी असल्याचे सांगितले़ तसेच मी गिफ्ट पाठविले असून ते सोडवून घेण्यास सांगितले़
क्रेगवर विश्वास ठेवलेल्या पाटील यांना ९ जुलै रोजी श्वेता नावाच्या मुलीने फोन केला व मी दिल्ली येथील डेल्टा कुरिअर सर्व्हिसची कर्मचारी असल्याचे सांगून पार्सल सोडविण्यासाठी ४२ हजार ५०० रुपये भरण्यास सांगितले़ पाटील यांनी दिलेल्या बँक खात्यात पैसे भरल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा दिल्ली एअरपोर्टच्या स्कॅनिंग विभागातून बोलत असल्याचे सांगून तुमच्या पार्सलमध्ये पैसे असल्याने तुम्हाला दंड तसेच पार्सलसाठी सोडविण्यासाठी १ लाख २५ हजार रुपये भरावे लागतील असे सांगण्यात आले़
पाटील यांनी दोन वेळा १ लाख लाख ६७ हजार ५०० रुपये संबंधितांच्या बॅक खात्यावर भरूनही पार्सल न मिळाल्याने त्यांना संशय आला व त्यांनी ओझर पोलीस ठाण्यात धाव घेतली व फिर्याद दिली़ या प्रकरणी ओझर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला़ या तपासात पाटील यांनी बॅकेत भरलेले अकाँटमधील पैसे संबंधित व्यक्तीने दिल्ली येथील एका एटीएममधून काढल्याचे समोर आले़ ग्रेटर नोएडा पोलीस व ग्रामीण पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून संशयितास सोमवारी अटक केली़
पोलिसांनी अटक केलेल्या मिचेल सोसन क्रेग याचे हे बनावट नाव असून खरे नाव किंग्जले चिबूकेम असल्याचे तपासात समोर आले आहे़दरम्यान, संशयित चिबूकेम यास ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पंकज भालेराव यांनी ताब्यात घेतले असून ते नाशिकला येत आहेत असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे़