जिल्हा परिषद कामांची माहिती संकेतस्थळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 05:01 PM2019-01-23T17:01:33+5:302019-01-23T17:02:32+5:30

नाशिक : एकलव्य आदिवासी निवासी शाळा व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप करत गेल्या ...

nashik,zilla,parishad,informatio.on,website | जिल्हा परिषद कामांची माहिती संकेतस्थळावर

जिल्हा परिषद कामांची माहिती संकेतस्थळावर

Next
ठळक मुद्दे विद्यार्थ्यांनी अटींवर अन्नत्याग आंदोलन घेतले मागे

नाशिक : एकलव्य आदिवासी निवासी शाळा व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप करत गेल्या सोमवारी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे आदिवासी विकास विभाग तसेच वसतिगृह प्रशासनाची धावपळ उडाली होती. सोमवारी रात्री आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त लोकेश सलामे, विद्यार्थी तसेच वसतिगृह प्रशासन यांच्यात सविस्तर चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अटी भोजन पुरवणाºया संस्थेकडे मांडून वसतिगृहातच हाताने बनविलेल्या पोळ्या बनवून देणे तसेच रोज जेवणात दिल्या जाणाºया भाजीचा दर्जा सुधराविण्याच्या अटीवर मंगळवारी विद्यार्थ्यांशी पुन्हा चर्चा करण्यात आल्यानंतर दुपारी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे.
भोजन पुरवठा करणाºया संबंधित कंपनीला वारंवार लेखी तक्रार करून जेवणाचा दर्जा सुधारत नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करून शाळेचे प्राचार्य देवरे, गृहपाल एन. एस. चौधरी यांच्याकडे तक्रार करून आंदोलन सुरू केले होते. मंगळवारी सकाळी या विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. यापुढे वसतिगृह आवारातच हाताने पोळ्या बनवून देणार तसेच दैनंदिन जेवणात दिल्या जाणाºया भाजीत रस्सा भाजी दिली जाणार अशा अटींवर विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेत मंगळवारी दुपारी भोजन घेतल्याची माहिती वसतिगृहाचे गृहपाल चौधरी यांनी दिली.

 


 

 

Web Title: nashik,zilla,parishad,informatio.on,website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.