पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेचा ट्रक रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 07:38 PM2019-08-14T19:38:55+5:302019-08-14T19:39:36+5:30
नाशिक: कोल्हा पूर आणि सांगली येथील पूर आपत्तीमुळे येथील जीवनमान विस्कळीत झाले असून रोजगार, आरोग्य आणि अन्नधान्याचा मोठा प्रश्न ...
नाशिक: कोल्हापूर आणि सांगली येथील पूर आपत्तीमुळे येथील जीवनमान विस्कळीत झाले असून रोजगार, आरोग्य आणि अन्नधान्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पूरग्रस्तांचे आश्रू पुसण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला असून जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला एक ट्रक कोल्हापूरकडे रवाना करण्यात आला.
जिल्हा परिषद आवारात सकाळी अध्यक्षा शितल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, बांधकाम सभापती मनिषा पवार, आरोग्य व शिक्षण सभापती यतीन पगार, समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर, महिला बालकल्याण समिती सभापती अपर्णा खोसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. यामध्ये १७ लक्ष रु पयांपर्यतच्या वस्तुंचा समावेश आहे.
अतिवृष्टीमुळे कोल्हापूर व सांगली जिल्हयात शहरे व गावे पूरपाण्यामुळे अद्यापपर्यत पूर्णपणे वेढलेली आहेत. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा मिळणे दुरापास्त झाले आहे. कोल्हापूर जिल्हयातील प्रशासकीय यंत्रणेने व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून मानवतेच्या दृष्टीकोनातून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी नाशिक जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, कर्मचारी व विविध कर्मचारी संघटना यांना वस्तू स्वरु पात धान्य, व जिवनावश्यक मुलभूत साहित्य परिषदेस जमा करण्याबाबत आवाहन केलेले होते. या आवाहनास प्रतिसाद म्हणून ग्रामसेवक संघटना, औषध निर्माण अधिकारी संघटना, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटना, नर्सेस संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, पशु वैद्यकीय अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना यांच्यासह जिल्हा परिषदेच्या कर्मचा-यांनी वैयिक्तक स्वरु पात मोठया प्रमाणात वस्तु जिल्हा परिषदेच्या पूरग्रस्तांसाठीच्या मदतीसाठी जमा केल्या.