नाशिक जिल्ह्यावर नैसर्गिक संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 04:22 PM2019-11-01T16:22:43+5:302019-11-01T16:24:35+5:30
नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतपीके आणि फळबागांचे झालेले नुकसान लक्षात घेता भुईसपाट झालेल्या शेतीउद्योगाच्या उभारणीसाठी राज्यात नैसर्गिक संकट ...
नाशिक: जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतपीके आणि फळबागांचे झालेले नुकसान लक्षात घेता भुईसपाट झालेल्या शेतीउद्योगाच्या उभारणीसाठी राज्यात नैसर्गिक संकट घोषित करून शेतकऱ्यांना भरीव मदत जाहिर करण्याची मागणी मनसेच्यावतीने निवेदनाद्वारे केली आहे.
परतीच्या पावसाने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. जिल्ह्यातील द्राक्ष, मका, सोयाबीन या पीाकांना मोठा फटका बसला आहे. पिकांसोबत फळबागांचेही नूकसान झाले आहे. शासनाने हे संकट नैसिर्गक आपत्ती म्हणून घोषित करावे. पंचनामे करु न तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र नविनर्माण सेनेने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
पावसाचा तडाखा लक्षात घेता राज्यात ओला दुष्काळासारखी परिस्थिती आहे. द्राक्ष, कांदा, डाळिंब, ज्वारी, बाजरी, मका, कपाशी, कडधान्य आदी पिकांचे मोठया प्रमाणात नूकसान झाले आहे. द्राक्ष, डाळिंब बागा झोपल्या आहेत. अनेक पिकांवर रोग आले असून शेतकºयांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे. शेतकºयांचे मोठया प्रमाणात आर्थिक नूकसान झाले आहे. सोसायटी व बॅक कर्जाचा बोजा आणखी वाढणार आहे. संकटाची तीव्रता पाहाता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर प्रदेश चिटणीस अशोक मुर्तडक, डॉ.प्रदीप पवार, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, रतनकुमार इचम आदींची स्वाक्षरी आहे.