नाशिप्र मंडळाचा ‘शिक्षण आपल्या दारी’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:10 AM2021-07-19T04:10:55+5:302021-07-19T04:10:55+5:30
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ ...
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ करण्यात आला असला तरी शाळा मात्र बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने संस्थेच्या शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये ऑनलाईन वर्ग तसेच ‘शिक्षण आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमास विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने स्मार्टफोन घेणे आवाक्याच्या बाहेर होते. अशा वेळी ‘शिक्षण आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी समजावून घेत परिसरातील मोकळी जागा, मंदिर सभागृह, समाजमंदिर या ठिकाणी विद्यार्थ्यांना एकत्रित करून शिक्षण देणे सुरू केले आहे. संस्थेच्या नाशिक, नाशिकरोड, सिन्नर, ईगतपुरी, नांदगाव या शैक्षणिक संकुलातील शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी कोरोनाचे सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे.
180721\18nsk_5_18072021_13.jpg
पंचवटी येथील मोरेमळा, रामवाडी येथील समाज मंदिर येथे विदयार्थ्यांना शिकवितानादेतांना शिक्षक