नाशिकच्या डॉक्टरांचाही संप सुरू ; अत्यावश्यक सेवा बंद
By admin | Published: March 22, 2017 09:01 PM2017-03-22T21:01:17+5:302017-03-22T21:01:17+5:30
राज्यातील डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामध्ये नाशिक जिल्ह्यातील डॉक्टरांनीदेखील काम बंद आंदोलन पुकारले आहे.
नाशिक : डॉक्टरांवर होणारे हल्ले आणि त्यामुळे वैद्यकिय पेशाची धोक्यात आलेली सुरक्षा यामुळे राज्यातील डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामध्ये नाशिक जिल्ह्यातील डॉक्टरांनीदेखील काम बंद आंदोलन पुकारले आहे. बुधवारी रात्री इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने संपाची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. शहरासह जिल्ह्यातील डॉक्टरांनी घेतलेल्या संपाच्या भुमिकेमुळे वैद्यकिय सेवेवर परिणाम होणार आहे. नव्याने उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांसाठी सर्व प्रकारची वैद्यकिय सेवा न देण्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे वैद्यकिय सेवा धोक्यात येणार आहे. कारण जिल्हयात स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढले असून जिल्ह्याभरात रुग्ण आढळून येत आहेत. शासकिय रुग्णालयांमधील वैद्यकिय सेवा सुरळीतपणे सुरू राहणार असून येथील वैद्यकिय व्यवस्थापनावर त्याचा अतिरिक्त ताण निर्माण होणार आहे.