मतदारांची माहिती गोळा करण्यात राज्यात नाशिक दुस-या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 03:28 PM2018-01-01T15:28:54+5:302018-01-01T15:29:33+5:30
१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत भारत निवडणूक आयोगाने मतदार पुर्नरिक्षण मोहिम राबविली. प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्याबरोबरच घरोघरी जावून मतदारांची माहिती संकलित करणे,
नाशिक : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार पुर्नरिक्षण मोहिमेंतर्गंत मतदारांची घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याच्या विशेष मोहिमेत नाशिकने थेट राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला असून, सुमारे ४,९० हजार घरांना भेटी देवून मतदारांची अद्यावत माहिती संकलित करण्यात आली आहे. या मोहिमेत बीड जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. अन्य मोठ्या शहरांमध्ये नाशिकच अग्रेसर राहिला आहे.
१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत भारत निवडणूक आयोगाने मतदार पुर्नरिक्षण मोहिम राबविली. प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्याबरोबरच घरोघरी जावून मतदारांची माहिती संकलित करणे, नवीन मतदार नोंदणी करणे, दुबार नाव वगळणे, मतदार केंद्रांचे स्थलांतर करणे, मतदाराच्या घरी गेल्यावर त्याचे अक्षांश, रेखांश जोडणे अशा प्रकारचे कामे केंद्रस्तरीय अधिकाºयांच्या (बीएलओ) मदतीने पार पाडण्याच्या आयोगाच्या सुचना होत्या, परंतु यंदा शिक्षकांनी हे काम करण्यास नकार दिल्याने मोठा अडथळा निर्माण झाला होता. शिक्षकांनी या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. अशाही परिस्थितीत निवडणूक शाखेने शिक्षकांना कधी गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देवून तर कधी अंजारून गोंजारून काम करण्यावर भर दिला होता. नाशिक जिल्ह्यातील एकूण साडेसात लाख घरभेटी देवून माहिती गोळा करण्याच्या या मोहिमेत शेवटच्या टप्प्यात केंद्र स्तरीय अधिकारी सहभागी झाल्याने ३० डिसेंबर अखेर जवळपास ४,९०,५७५ घरांना भेटी देवून माहिती गोळा केली आहे. राज्यात नाशिकने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
निवडणूक आयोगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्याने या संदर्भात केलेल्या माहितीचा गोषवारा प्रसिद्ध केला असून, त्यात बीड जिल्हा प्रथम असून, नाशिक नंतर तिस-या स्थानावर अनुक्रमे सोलापुर, उस्मानाबाद, सांगली, अहमदनगर, जळगाव, पुणे, यवतमाळ व बुलढाणा दहाव्या क्रमांकावर आहे. या मोहिमेतील अद्यावत माहितीच्या आधारे १० जानेवारी रोजी प्रसिद्ध होणाºया अंतीम मतदार यादी तयार केली जाणार आहे.