दोनवाडेकरांनी अनुभवली पट्ठे बापूरावांच्या लावणीची अदाकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 06:55 PM2019-03-18T18:55:45+5:302019-03-18T18:56:43+5:30
देवळाली कॅम्प : राज्य शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या सहयोगाने येथील मारूती मंदिरात शाहीर पठ्ठे ...
देवळाली कॅम्प : राज्य शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या सहयोगाने येथील मारूती मंदिरात शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या लावण्याच्या बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.
भगूरजवळील दोनवाडे येथील शिवक्र ांती युवा प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या संकल्पनेतून आणि लेखनातून व लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे मार्गदर्शनाखाली या कार्यक्र माचे दिग्दर्शन योगेश चिकटगावकर यांनी केले. सुभाष खरोटे, अतांबर शिरढोणकर, विकास कोकाटे यांच्या गायनाने संगीत संयोजन विजय चव्हाण, कृष्णा मुसळे, मदन दुबे नृत्य दिग्दर्शन हेमाली शेडगे-म्हात्रे यांसह प्रमिला लोदगेकर, प्राजक्ता महामुनी, स्मिता वेताळे यांसह सहनृत्यांगनांनी एकापेक्षा एक फक्कड लावण्यांवर नृत्य सादर केले.
प्रारंभी आयोजक अशोक ठुबे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना सर्व कलाकारांचे स्वागत केले. कार्यक्र मामध्ये गण,गौळण,वग,बतावणी व लावणी अशा पंचरंगी कार्यक्र मास पंचक्र ोशीतील नागरिक उपस्थित होते.