दोन हजार ग्राहकांचा पर्यावरणाला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 04:55 PM2019-01-10T16:55:15+5:302019-01-10T16:59:30+5:30

महावितरण : गो-ग्रीन वीजबीलाचा ग्राहकांकडून वापर नाशिक : पर्यावरण रक्षणासाठी कागदविरहीत वीजबीलाला महावितरणकडून देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन योजनेला नाशिक परिमंडळात ...

nasik,contribute,environment,two,thousand,customers | दोन हजार ग्राहकांचा पर्यावरणाला हातभार

दोन हजार ग्राहकांचा पर्यावरणाला हातभार

Next
ठळक मुद्देनाशिक शहर मंडळातील १०४३, मालेगाव मंडळातील


महावितरण : गो-ग्रीन वीजबीलाचा ग्राहकांकडून वापर
नाशिक: पर्यावरण रक्षणासाठी कागदविरहीत वीजबीलाला महावितरणकडून देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन योजनेला नाशिक परिमंडळात चांगला प्रतिसाद लाभला असून परिमंमहळातील २१३७ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
महावितरणने १ डिसेंबर २०१८ ला ग्रीन-वीजबीलाचा कल्पा मांडली होती. छापील वीजबीलाऐवजी ई-मेल किंवा एसएमएसचा पर्याय स्विकारणाºया ग्राहकांना प्रती वीजबील दहा रूपये सवलत देण्याची ही योजना होती. मागील एका महिन्यात राज्यातील सुमारे २१ हजार तर नाशिक परिमंडळातील २१३७ ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. अन्य ग्राहकांनीही या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजबील आॅनलाईन पाहण्यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल अ‍ॅप व महावितरणच्या संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबीलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतू जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध करून दिले जाते. अशा सर्व ग्राहकांना १ डिसेंबर २०१८ पासून प्रतीबील १० रु पये सवलत दिली जात आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजिबलावरील गो-ग्रीन क्र मांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अँपद्वारे अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर करावी, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.
नाशिक शहर मंडळातील १०४३, मालेगाव मंडळातील २९४ आण अहमदनगर मंडळातील ८०० ग्राहक सध्या या सुविधेचा लाभ घेत असून प्रतिबिल १० रु पयांची त्यांची बचत होत आहे.
--इन्फो--
पर्यावरण संवर्धनाला हातभार
गो-ग्रीनचा पर्याय निवडणाºया ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून संदर्भासाठी वीजिबलाचे जतन करणेही त्यांना सोपे ठरणार आहे. गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा लाभ ग्राहकांनी घेतला पाहिजे.- -संजीव कुमार,
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

Web Title: nasik,contribute,environment,two,thousand,customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.