थंडीच्या कहरने नाशिककर हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 01:57 AM2019-02-10T01:57:56+5:302019-02-10T01:58:15+5:30
थंडीचा कहर शहरासह जिल्ह्यात सुरूच असून, शनिवारी (दि.९) किमान तापमानाचा पारा थेट ४ अंशांपर्यंत घसरला. त्यामुळे थंडीच्या कडाक्याने नाशिककर पुन्हा गारठले आहेत. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली असून, सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नाशिक राज्यात पुन्हा अव्वलस्थानी राहिले आहे.
नाशिक : थंडीचा कहर शहरासह जिल्ह्यात सुरूच असून, शनिवारी (दि.९) किमान तापमानाचा पारा थेट ४ अंशांपर्यंत घसरला. त्यामुळे थंडीच्या कडाक्याने नाशिककर पुन्हा गारठले आहेत. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली असून, सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नाशिक राज्यात पुन्हा अव्वलस्थानी राहिले आहे.
उत्तर भारतात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑसह विदर्भ गारठला आहे. हवामान खात्याकडून प्राप्त सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरासह संपूर्ण जिल्ह्यात थंडीची लाट रविवारी (दि.१०) मध्यरात्रीपर्यंत कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकाधिक सतर्कता बाळगून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अनावश्यकरीत्या सकाळी व संध्याकाळी घराबाहेर पडणे टाळावे. उबदार कपड्यांचा पुरेपूर वापरास प्राधान्य द्यावे. सकाळच्या वेळीस व्यवसाय करणाºया विक्रेत्यांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शहराचे किमान तापमान पाच दिवसांपूर्वी १७ अंशांपर्यंत वर सरकले होते. त्यामुळे थंडीपासून दिलासा नागरिकांना मिळाला होता; मात्र थंड वाºयाचा वेग अचानकपणे वाढल्याने किमान व कमाल तापमानात मोठी घसरण होऊन शनिवारी (दि.९) सकाळी साडेआठ वाजता पारा ४ अंशांवर घसरला तर कमाल तापमान ३२ अंशांवरून २४ अंशांपर्यंत खाली आल्याने थंडीची तीव्रता अधिकच जाणवत आहे. त्यामुळे नाशिककर शुक्र वारपासून कमालीचे गारठले आहेत.
बुधवारी रात्रीपासून शहरात थंड वारे वेगाने वाहू लागल्याने वातावरणात निर्माण झालेला गारवा कायम टिकून राहिला आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत ताशी १३ कि.मी. वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली होती. त्यामुळे शुक्रवारी किमान तापमान १३.२ अंशांवरून थेट ९ अंशांवर घसरले. शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेनंतर पुन्हा थंड वाºयाचा वेग वाढल्याने शनिवारी सकाळी पारा ४ अंशांपर्यंत घसरला. यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.
थंडीच्या कडाक्याने घरात बसणेदेखील मुश्कील झाल्यामुळे उघड्यावर झोपडीत राहणाºया भटक्या लोकांचे आतोनात हाल होत आहे. तसेच गोदेच्या किनारी उघड्यावर किंवा मंदिरांच्या आवारात राहून रात्र काढणारे भिक्षुकवर्ग थंडीने बेहाल झाला असून, गोदाकाठावर शेकोट्या पेटवून हा ऊब मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.