शहरात टप्प्याटप्प्याने पावसाच्या सलामीमुळे नाशिककरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 10:35 PM2017-09-10T22:35:43+5:302017-09-10T22:38:19+5:30

अधूनमधून पावसाची उपनगरीय परिसरात तुरळक हजेरी होती; मात्र शनिवारपासून पावसाने उपनगरीय परिसरात जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. शनिवारी संध्याकाळी पावसाने वर्दी दिली. रविवारी दुपारी बारा वाजेपासूनच शहरात ढगाळ हवामान तयार झाले आणि थंड वाराही सुटला. क्षणार्धात टपोºया थेंबासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

 Nasikkar's relief to the residents of the suburbs, in a phased manner in the city | शहरात टप्प्याटप्प्याने पावसाच्या सलामीमुळे नाशिककरांना दिलासा

शहरात टप्प्याटप्प्याने पावसाच्या सलामीमुळे नाशिककरांना दिलासा

Next

नाशिक : पावसाने विश्रांतीनंतर रविवारी (दि.१०) दमदार सलामी दिली. भाद्रपदचे ऊन तापू लागल्यामुळे वातावरणात उष्माही जाणवत होता. कमाल तपमानाने तिशी ओलांडली आहे. अशा वातावरणात पावसाने दुपारपासून शहरासह उपनगरीय परिसरात टप्प्याटप्प्याने दिलेल्या सलामीमुळे नाशिककरांना दिलासा मिळाला.
गणेशोत्सवाच्या अखेरच्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. अधूनमधून पावसाची उपनगरीय परिसरात तुरळक हजेरी होती; मात्र शनिवारपासून पावसाने उपनगरीय परिसरात जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. शनिवारी संध्याकाळी पावसाने वर्दी दिली. रविवारी दुपारी बारा वाजेपासूनच शहरात ढगाळ हवामान तयार झाले आणि थंड वाराही सुटला. क्षणार्धात टपोºया थेंबासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाथर्डी, वडाळागाव, अशोकामार्ग, डीजीपीनगर, भाभानगर, जुने नाशिकसह तिडके कॉलनी परिसरात मुसळधार पाऊस झाला; मात्र टिळकवाडी, शरणपूररोड, सीबीएस, पंचवटी, नाशिकरोड, मेरी, म्हसरूळ भागात कडक ऊन पडलेले होते. दुपारी तीन वाजेपासून मात्र या कोरड्या परिसरातही पावसाला दमदार सुरुवात झाली. साडेचार वाजता पंचवटी परिसराला पावसाने झोडपले तर संध्याकाळी साडेपाच वाजेपासून सिडको,जेलरोडमध्येही जोरदार पाऊस सुरू झाला.

कमाल तपमान ३३ अंशांवरच
मागील चार दिवसांपासून तीस अंशांच्या जवळपास स्थिरावणारा कमाल तपमानाचा पारा रविवारी मात्र ३३.२ अंशांपर्यंत सरकला. रविवारी दिवसभर ढगाळ हवामान असल्यामुळे उष्मा जाणवत होता, तसेच वाºयाचा वेगही अत्यंत मंदावलेला राहिला. दुपारनंतर शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. एकूणच दिवसभर पावसाची सुरू असलेली सलामी आणि उघडीप यामुळे तपमानात उष्मा कायम राहिला.


ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट
शहरात पावसाची दिवसभर अल्प उघडीप अन् मुसळधार वर्षाव ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह सुरू होता. ढगांच्या गडगडाटाने होणाºया या पावसाचे वैशिष्ट्य म्हणजे थेंब टपोरे असल्याचे जाणवत होते. कमी वेळेत वेगाने टपोºया थेंबांच्या वर्षावामुळे रस्त्यावरील वाहनेही दिसत नव्हती. वाहनचालकांकडून दिवे सुरू करून वाहतूक केली जात होती.

Web Title:  Nasikkar's relief to the residents of the suburbs, in a phased manner in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.