एमटीबी सायकल स्पर्धेसाठी नाशिकचे तीन सायकलपटू
By Admin | Published: March 20, 2017 02:43 PM2017-03-20T14:43:44+5:302017-03-20T14:43:44+5:30
नर्चर द टॅलेंट उपक्रमाचा खेळाडूंना लाभ : नाशिकचे सायकलपटू भरत सोनवणे, अरु ण भोये, गोपीनाथ मुंढे यांची निवड करण्यात आली
नाशिक : सायकलिंग फेडरेशन इंडियाच्या वतीने आणि उत्तराखंड टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डाच्या सहकार्याने घेण्यात येणाऱ्या एमटीबी सायकल स्पर्धेसाठी नाशिकचे सायकलपटू भरत सोनवणे, अरु ण भोये, गोपीनाथ मुंढे यांची निवड करण्यात आली असून, हे सायकलपटू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
पुरुषांच्या १८ ते ३५ वर्षवयोगटासाठी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेसाठी अहमदनगर येथे रविवारी (दि. १९) सायकलिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्यातर्फे निवडचाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या निवडचाचणीत नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशनतर्फे सहभागी झालेले भारत सोनवणे, अरु ण भोये, गोपीनाथ मुंढे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करत एमटीबी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. एमटीबी ही सायकल स्पर्धा शुक्रवार (दि. ७) ते सोमवार (दि. १७) एप्रिल दरम्यान होणार असून स्पर्धकांना नैनिताल ते मसुरी हे ८८६ किमीचे अंतर पार करावे लागणार आहे. तसेच या स्पर्धेतील विजेत्यांना दहा लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.