सुस्थितीतील आरोग्य उपकेंद्र दाखविले गळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 05:52 PM2018-12-07T17:52:25+5:302018-12-07T17:53:21+5:30

नाशिक : मालेगाव तालुक्यातील दाभाडी आरोग्य उपकेंद्राला गळती लागल्याचे कारण पुढे करीत नुतणीकरणासाठी जिल्हा परिषदेला अंदाजपत्रक सादर करण्यात आले ...

nasshik,suitable,health,subcenters,show.lacerations | सुस्थितीतील आरोग्य उपकेंद्र दाखविले गळके

सुस्थितीतील आरोग्य उपकेंद्र दाखविले गळके

Next
ठळक मुद्देभांडाफोड: प्रत्यक्ष पाहाणीत आढळले कारनामा उघड


नाशिक : मालेगाव तालुक्यातील दाभाडी आरोग्य उपकेंद्राला गळती लागल्याचे कारण पुढे करीत नुतणीकरणासाठी जिल्हा परिषदेला अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात या आरोग्य केंद्राची पाहाणी केली असता इमारत कुठेही गळत नसल्याची बाब समोर आली आणि बोगस अंदाजपत्रकाचा कारनामाही समोर आला.
मालेगाव तालुकयातील दाभाडी येथील आरोग्य उपक्र ेंद्राच्या (क्र .२) नुतनीकरणाच्या कामाचे अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. बुधवारी मालेगाव येथील रूरबन योजनेची बैठक आटोपल्यानंतर मुख्य कार्यकारी डॉ. नरेश गिते यांनी अचानक या केंद्राला भेट देवून अंदाजपत्रकात नमूद कामांची पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. अंदाजपत्रकात नमूद करण्यात आलेल्या उपकेंद्राच्या गळतीबाबत स्पष्टीकरण करताना यंत्रनेची एकच तारांबळ उडाली. गळती शोधण्यासाठी डॉ. गिते यांनी चक्क उपकेंद्राच्या इमारतीवर चढून पाहणी केली असता त्यांना तेथे गळतीसारखे काहीही आढळले नाही. सदर उपकेंद्रात प्रस्तावित केलेल्या कामांची तपासणी करून नव्याने अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश डॉ. गिते यांनी यंत्रणेला दिले.
राष्ट्रीय ग्रामीण अभियान अंतर्गत आरोग्य विभागात पायाभूत सुविधा विकास कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या वतीने जिल्हयातील रूग्णालयांमधील कामांचे नुतणीकरण करण्यात येते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत दाभाडी येथील आरोग्य उपक्र ेंद्राच्या (क्र .२) नुतनीकरणासाठी अंदाजपत्रक तयार करु न मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. डॉ. गिते यांनी प्रत्यक्ष उपकेंद्राला भेट देवून तसेच अन्य अभियंत्यांकडून अंदाजपत्रकाबाबत खात्री केली असता जादा रकमेचे अंदाजपत्रक सादर केल्याचे निर्दशनास आले. विशेष म्हणजे उपकेंद्रास गळती असल्याचे अंदाजपत्रकात नमुद असताना गळती नेमकी कोठे होते याचे उत्तर संबंधितांना देता आले नाही. उपकेंद्रामधील आरोग्य सेविकेच्या निवासस्थानी जावून डॉ. गिते यांनी माहिती घेतली असता त्यांनी इमारत गळत नसल्याचे सांगितले.

Web Title: nasshik,suitable,health,subcenters,show.lacerations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.