पळसे टोल नाक्यावर राष्टÑवादीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 01:40 AM2019-11-12T01:40:17+5:302019-11-12T01:40:58+5:30
पळसे गावातील विविध समस्यांबाबत सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चेतक कंपनी प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले.
नाशिकरोड : पळसे गावातील विविध समस्यांबाबत सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चेतक कंपनी प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले.
पळसे परिसरात विविध अपघातांत सात नागरिकांचा बळी गेला आहे. झेब्रा क्रॉसिंगवर गतिरोधक तसेच हायमास्ट बसविण्यात यावे, बंगालीबाबा ते पळसे पूलदरम्यान अर्धवट बसविलेले पथदीपाचे काम पूर्ण करावे, पळसे गावाजवळील अमरधाम रस्त्याकडे जाणाऱ्या अर्धवट सर्व्हिसरोडचे काम पूर्ण तयार करावे आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक तालुका अध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी अकरा वाजता शिंदे टोल नाका येथे चेतक कंपनीचे व्यवस्थापक विठ्ठल पाटील यांना घेराव घातला.
यावेळी टोल नाका प्रशासन अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. व्यवस्थापक पाटील यांना धारेवर धरत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलनामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस नाशिक तालुका अध्यक्ष संदेश टिळे, राजाभाऊ जाधव, निखिल भागवत, कैलास कळमकर, अविनाश टिळे, मोहन टिळे, गणेश टिळे, कुमार गायधनी, विकी जाधव, प्रशांत राजगुरू, सोनू वाईकर, मदन गोडसे, प्रशांत काळे, नामदेव शिंदे, श्रीकांत टावरे आदी सहभागी झाले होते.