नाशिकमध्ये इंधन दरवाढी विरोधात राष्टÑवादीची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:19 PM2018-04-05T18:19:24+5:302018-04-05T18:19:24+5:30
आंदोलनकर्त्यांनी ‘पेट्रोल डिझेल के बढे दाम, सरकारने किया जिना हराम’,‘नही चाहिये अच्छे दिन, लोटा दो पुराने दिन’, ‘वाह रे सरकार तेरा खेल, खा गये राशन बढ गया तेल’ अशा प्रकारच्या घोषणा देऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला असून, नाशिकमध्ये पेट्रोलचे दर ८२ रुपये ३९ पैसे
नाशिक : पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी दुपारी सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथील पेट्रोलपंपाजवळ सरकारच्या निषेधार्थ फलक घेऊन जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘पेट्रोल डिझेल के बढे दाम, सरकारने किया जिना हराम’,‘नही चाहिये अच्छे दिन, लोटा दो पुराने दिन’, ‘वाह रे सरकार तेरा खेल, खा गये राशन बढ गया तेल’ अशा प्रकारच्या घोषणा देऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला असून, नाशिकमध्ये पेट्रोलचे दर ८२ रुपये ३९ पैसे, तर डिझेलचा एक लिटरचा दर ६८ रुपये ४ पैसे झाला आहे. आतापर्यंतचा डिझेल, पेट्रोल दराचा हा उच्चांक आहे. विशेष म्हणजे मुंबईत लिटरमागे पेट्रोलचे दर ८१ रुपयांवर, तर डिझेल प्रतिलिटर ६८ रुपये आहे. फेब्रुवारी २०१८ नंतर पेट्रोल डिझेलच्या दराच्या उच्चांकाने गाठलेला हा नवा पल्ला आहे. गेल्या वर्षभरात तर पेट्रोल ९ रुपये, तर डिझेलमध्ये ७ रुपयांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे नाशिक शहरातही प्रत्येक पेट्रोलपंपावर वेगवेगळे दर असून, त्यात ५ पैशांच्या आसपास फरक आहे. या दरवाढीचा सर्वच वस्तूंवर परिणाम होणार असल्यामुळे त्याचाही फटका बसणार असल्याचे युवक कॉँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारने रोजच्या रोज दरवाढ करण्याऐवजी तीन महिन्यांनी दरांमध्ये फरक करावा, पेट्रोल-डिझेलचे इतर कर काढून जीएसटी किंवा वस्तू सेवा कराच्या कार्यकक्षेत घ्यावे तसेच महाराष्ट्र व लगतच्या राज्यातील पेट्रोल-डिझेलची किंमत एकसमान करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली. याप्रसंगी चिन्मय गाढे, अमोल नाईक, मुकेश शेवाळे, शिवराज ओबेरॉय, दीपक पाटील, मकरंद सोमवंशी, किरण पानकर, भूषण गायकवाड, कुणाल बागडे, सिद्धांत काळे, विशाल डोखे, कैलास धात्रक, सुनील तुपे, प्रवीण घोटेकर, अमोल तुपे, रोहित नाईक, इमरान अन्सारी, नीलेश कर्डक, पप्पू इंगळे, रोहित जाधव, राजरांधा वाघ, गणेश पाटील, प्रेम पालीवाल, संदीप चव्हाण, नीलेश भामरे, मुराघ राख, अक्षय राउत आदींसह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.