नाशिकच्या संरक्षणाला केंद्रीय सुरक्षा बलाचे ‘कडे’ ओढ्याला नवी प्रशिक्षण अकादमी : ६७ एकर जागेवर साकारणार प्रकल्प; १२५० सशस्त्र जवान राहणार तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 01:05 AM2018-01-01T01:05:40+5:302018-01-01T01:06:55+5:30

नाशिक : देशपातळीवर अतिरेक्यांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पेलण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने महाराष्टÑातील नाशिक व मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी दोन सुरक्षा तळे उभारण्याचा निर्णय घेतला.

National Academy of Defense for the protection of Nashik, will be upgraded to 67 acres of land; 1250 armed soldiers will remain posted | नाशिकच्या संरक्षणाला केंद्रीय सुरक्षा बलाचे ‘कडे’ ओढ्याला नवी प्रशिक्षण अकादमी : ६७ एकर जागेवर साकारणार प्रकल्प; १२५० सशस्त्र जवान राहणार तैनात

नाशिकच्या संरक्षणाला केंद्रीय सुरक्षा बलाचे ‘कडे’ ओढ्याला नवी प्रशिक्षण अकादमी : ६७ एकर जागेवर साकारणार प्रकल्प; १२५० सशस्त्र जवान राहणार तैनात

Next
ठळक मुद्देऔद्योगिक सुरक्षा दलाच्या तळाचे काम लष्कराप्रमाणे या दलाचा उपयोग

नाशिक : देशपातळीवर अतिरेक्यांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पेलण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने महाराष्टÑातील नाशिक व मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी दोन सुरक्षा तळे उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी केल्या जाणाºया जागेचा शोधही संपुष्टात आला आहे. नाशिकपासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर असलेल्या ओढा-सय्यदपिंप्री या दोन्ही गावांच्या सीमेवर सुमारे ६७ एकर जागेवर लवकरच औद्योगिक सुरक्षा दलाच्या तळाचे काम केले जाणार आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नाशिक येथे तळ करण्यामागे अनेक कारणे देण्यात आली असून, त्यात प्रामुख्याने ओझर व आर्टिलरी सेंटरच्या गांधीनगर या दोन्ही विमानतळाच्या सुरक्षेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. याशिवाय नाशिकरोडच्या करन्सी नोट प्रेस, मध्यवर्ती कारागृह, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र, रेल्वेस्थानकाच्याही सुरक्षेचा आढावा मध्यंतरी घेण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने ते संवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिकमधील सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांबरोबरच लगतच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यांत उद्भवलेल्या आपद्स्थितीचा सामना करण्यासाठीही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कामी येणार आहे.
नैसर्गिक आपत्तीचा सामना, पूरस्थितीत बचाव व मदतकार्यासाठीही लष्कराप्रमाणे या दलाचा उपयोग करून घेण्यात येणार आहे. नाशिकपासून जवळच त्यासाठी जागेची निश्चिती करण्यात आली असून, ओढा-सय्यदपिंप्री या दोन्ही ग्रामपंचायतींच्या सीमेवर सुमारे ६७ एकर जागा ताब्यात घेण्यासाठी ३२ कोटी रुपयांचे शासकीय मूल्यही भरण्यात आले आहे. मध्यंतरी औद्योगिक सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या जागेची पाहणी करून आपली पसंतीही प्रशासनाला कळविली आहे. या जागेवर संपूर्ण बटालियनच्या निवासाची, ट्रेनिंगची सुविधा उभारण्यात येणार असून, राज्यात कोठेही गरज पडल्यास या दलाची सहाय्यता घेण्यात येणार आहे.
एकाचवेळी १२५० सशस्त्र जवानांची आवश्यकता भासेल त्याठिकाणी रवानगी करण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगितले.
विमानतळ, आर्टिलरीची होणार सुरक्षा
केंद्रीय गृहमंत्रालयाने काही महिन्यांपूर्वीच देशातील महत्त्वाच्या शहरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने साधारणत: १२५० सशस्त्र जवानांचा समावेश असलेल्या दोन बटालियन कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी नाशिक व भोपाळ या दोन शहरांची निवड केली आहे.
या सुरक्षा दलाचा उपयोग विमानतळ, सागरी पोर्ट, शासकीय महत्त्वाच्या इमारती, आर्टिलरी सेंटर, पुरातत्व खात्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेसाठी करण्याबरोबरच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौºयाच्या सुरक्षेची जबाबदारीही देण्यात येणार असल्याचे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: National Academy of Defense for the protection of Nashik, will be upgraded to 67 acres of land; 1250 armed soldiers will remain posted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक