हिंदी साहित्य सभेतर्फे राष्टÑीय पुरस्कार सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:22 AM2017-10-28T00:22:35+5:302017-10-28T00:22:40+5:30
अखिल भारतीय हिंदी साहित्य सभेतर्फे राष्टÑीय स्तरावरील साहित्य पुरस्काराचे व सोबत हास्य कविसंमेलनाचे रविवार, दि. २९ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक : अखिल भारतीय हिंदी साहित्य सभेतर्फे राष्टÑीय स्तरावरील साहित्य पुरस्काराचे व सोबत हास्य कविसंमेलनाचे रविवार, दि. २९ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून प्रदीप शेणई, डॉ. कपिलदेव प्रसाद मिश्र, डॉ. आनंद प्रकाश गौड उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता हॉटेल उत्सव, नाशिकरोड येथे होईल. कार्यक्रमाच्या दुसºया सत्रात हिंदी हास्य कविसंमेलन होणार असून, प्रसिद्ध हास्यकवी रवींद्र रवि, आनंदराज आनंद, प्रशांत मिश्र आदी सहभागी होणार आहेत. अध्यक्षस्थानी घनश्याम अग्रवाल राहतील. संचालन रमेश शर्मा धुंआधार करतील. प्रमुख पाहुणे म्हणून ओम तिवारी, डॉ. प्रियंका सोनी आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष शीला डोंगरे, सुबोध मिश्र यांनी केले आहे.
विविध पुरस्कार
यावर्षी साहित्य साधना पुरस्कार- डॉ. सुधा चौहान, विद्योत्तमा साहित्य पुरस्कार- सुनीता डागा, साहित्य सृजन पुरस्कार- रामबाबू नीरव, साहित्य आराधना पुरस्कार- डॉ. राधेश्याम भारतीय, स्व. महादेवी वर्मा साहित्य पुरस्कार- डॉ. रंजना गौड, अहिसास गौरव पुरस्कार- डॉ. रोचना भारती, अहिसास भूषण पुरस्कार- डॉ. सुरचना त्रिवेदी, डॉ. संगीता सक्सेना, विजय सक्सेना, डॉ. रमेश मीलन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवी पुरस्कार- डॉ. कपिलदेव प्रसाद मिश्र यांना देऊन राष्टÑीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.