टाकेद विद्यालयाच्या उपकरणाला राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:16 AM2021-09-22T04:16:36+5:302021-09-22T04:16:36+5:30

या विज्ञान प्रदर्शनात संपूर्ण देशातून ३५ राज्यांनी भाग घेतला होता. त्यात ५१८ उपकरणे नोंदविण्यात आली होती. त्यापैकी महाराष्ट्रातून ३५ ...

National Award for Taked School Equipment | टाकेद विद्यालयाच्या उपकरणाला राष्ट्रीय पुरस्कार

टाकेद विद्यालयाच्या उपकरणाला राष्ट्रीय पुरस्कार

Next

या विज्ञान प्रदर्शनात संपूर्ण देशातून ३५ राज्यांनी भाग घेतला होता. त्यात ५१८ उपकरणे नोंदविण्यात आली होती. त्यापैकी महाराष्ट्रातून ३५ विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी महाराष्ट्रातील चार शाळांना राष्ट्रीय इन्स्पायर अवॉर्ड केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान डॉ. जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आले.

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, टाकेदचे प्राचार्य तुकाराम साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आकाश मोंढे व मार्गदर्शक शिक्षक प्रा. अमोल भालेराव यांनी तयार केलेले उपकरण ‘लाइफ सेव्हर वायफर’ यास राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नलगे, सचिव प्रकाश जाधव, स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. अशोक तुवर, तसेच टाकेगावचे सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे, उपमुख्याध्यापक संजय पाटील, माजी मुख्याध्यापक कचेश्वर मोरे, प्राध्यापक अरुण मोंढे, राजेंद्र गायकवाड, मनोज चव्हाण, डी.व्ही. चव्हाण, प्रा. विलास खापरे, श्रीराम लोहार, बी.एस. पवार, प्रमोद परदेशी आदींनी कौतुक केले.

(२१ टाकेद १)

शिक्षक अमोल भालेराव व विद्यार्थी आकाश मोंढे यांचे अभिनंदन करताना प्राचार्य तुकाराम साबळे, माजी प्राचार्य कचेश्वर मोरे, सचिन सोनवणे, राजाराम कोळी आदी.

210921\21nsk_26_21092021_13.jpg

शिक्षक अमोल भालेराव व विद्यार्थी आकाश मोंढे यांचे अभिनंदन करताना प्राचार्य तुकाराम साबळे, माजी प्राचार्य कचेश्वर मोरे, सचिन सोनवणे, राजाराम कोळी आदी.

Web Title: National Award for Taked School Equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.