नाशिकच्या दोन ग्रामपंचायतींना राष्टÑीय पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 08:10 PM2020-06-18T20:10:08+5:302020-06-18T20:10:44+5:30
केंद्र शासनामार्फत पंचायत राज संस्थेच्या उल्लेखनीय कामकाजाबाबत प्रोत्साहन मिळावे व क्षेत्रीय स्तरावर विकासात्मककामे होऊन पंचायत राज संस्थेमार्फत मिळणाºया सुविधांसाठी दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजना सुरू करण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : केंद्र शासनाचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार जाहीर झाला असून, त्यात नाशिक तालुक्यातील ओढा व कोटमगाव या दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय स्वरूपाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल गुरुवारी जिल्हा परिषदेच्या वतीने दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण पंतप्रधानाच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात येणार असून, दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपये व सन्मान चिन्हासह गौरविण्यात येणार आहे.
केंद्र शासनामार्फत पंचायत राज संस्थेच्या उल्लेखनीय कामकाजाबाबत प्रोत्साहन मिळावे व क्षेत्रीय स्तरावर विकासात्मककामे होऊन पंचायत राज संस्थेमार्फत मिळणाºया सुविधांसाठी दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण १३८५ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १०० गुणांसाठी ३९ प्रश्नावलीसह प्रस्ताव सादर केले होते. सदर प्रस्तावांची केंद्र शासनामार्फत तपासणी करण्यात आली असून, त्यात नाशिकसह महाराष्टÑातील चौदा ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत.
सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत गुरुवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, आनंद पिंगळे यांच्या हस्ते ओढा ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू पेखळे, उपसरपंच शशिकांत सहाणे, ग्रामसेवक दौलत गांगुर्डे, तसेच कोटमगाव ग्रामपंचायतीचे सरपंच बाळकृष्ण म्हस्के, उपसरपंच समाधान जाधव व ग्रामसेवक बाळासाहेब कदम, जिल्हा परिषद सदस्य यशंवत ढिकले, पंचायत समितीच्या सभापती विजया कांडेकर, गट विकास अधिकारी डॉ. सारिका बारी, विनोद मेढे, श्रीधर सानप, जगन्नाथ सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला, तर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दोन्ही ग्रामपंचायतींच्या पदाधिकारी, अधिकाºयांचे कौतुक केले आहे.