राष्ट्रीय दृष्टिहीन संघातर्फे अंध व्यक्तींना पांढरी काठीचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:40 AM2018-10-24T00:40:03+5:302018-10-24T00:40:27+5:30
समाजातील अंध मुला-मुलींना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे कार्य गौरवास्पद आहे, असे नगरसेवक प्रा. डॉ. वर्षा भालेराव यांनी व्यक्त केले.
नाशिक : समाजातील अंध मुला-मुलींना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे कार्य गौरवास्पद आहे, असे नगरसेवक प्रा. डॉ. वर्षा भालेराव यांनी व्यक्त केले. जागतिक पांढरी काठी दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय दृष्टिहीन संघाने नाशिक विभागातील अंध व्यक्तींना पांढरी काठीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भालेराव बोलत होत्या. या उपक्रमासाठी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने मदत केली आहे. डॉ. भालेराव पुढे म्हणाल्या की, आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून मी मनपाच्या मानधनातून बहुतांशी रक्कम दिव्यांगांच्या मदतीसाठी खर्च करते. याप्रसंगी भाजपाचे महानगर उपाध्यक्ष अनिल भालेराव, सचिव अजित कुलकर्णी, गजानन केटरर्सचे पंकज पाटील, सुनील शर्मा, दृष्टिहीन संघाचे उपाध्यक्ष पुंडलिक आवळे, अंजली बोराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाराम गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन संजय घोडेराव यांनी केले. तर आभार चिंतामण अहिरे यांनी मानले. कार्यक्र मास जगदीश पवार, अनिस गावित आदी दृष्टिहीन संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे
नाशिक मनपामध्ये दिव्यांगांसाठी विशेष निधी राखीव आहे, तो गरजूंना मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येतील. समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.