राष्ट्रीय सेनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून उभारला बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 05:35 PM2019-01-01T17:35:09+5:302019-01-01T17:35:22+5:30
वडझिरे : तालुक्यात वडझिरे येथे राष्टÑीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून २६ मीटर लांबीचा व २.५ मीटर उंचीचा बंधारा साकारला आहे. यात सुमारे ३० लाख लिटर पाणी साठवण क्षमता आहे.
वडझिरे : तालुक्यात वडझिरे येथे राष्टÑीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून २६ मीटर लांबीचा व २.५ मीटर उंचीचा बंधारा साकारला आहे. यात सुमारे ३० लाख लिटर पाणी साठवण क्षमता आहे.
नाशिक येथील क्रांतीवीर व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दिंडोरीच्या कला, वाणिज्य महाविद्यालय, लोकनेते गोपीनाथ मुंडे इन्स्टीट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च काँलेज, नाशिक, वनवजीवन विधी महाविद्यालय सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने वडझिरे येथे विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.
शिबिरात सहभागी झालेल्या २२५ विर्थ्यांनी जलसंधारण मोहिम राबवून २६ मिटर लांबीचा २.५ मिटर उंचीचा व ३० लाख लिटर क्षमतेचा मातीबांध उभारला. यासाठी ग्रामपंचायतीने विशेष सहकार्य केले. गावात स्वच्छता मोहिम राबवून प्रत्येक गल्ली स्वच्छ करण्यात आली. त्यांनतर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सात दिवसीय शिबिराचे आयोजित केले होते.