राष्ट्रीय ग्राहक पंधरवडा कार्यक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 11:46 PM2020-01-08T23:46:29+5:302020-01-08T23:47:18+5:30
मविप्रच्या कर्मवीर आमदार पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक पंधरवड्यानिमित्त कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे नाशिक विभागीय अध्यक्ष अरुण भार्गवे, जिल्हाध्यक्ष सुधीर काटकर, जिल्हा सचिव सुरेशचंद्र धारणकर, महानगर संघटक प्रशांत देशमुख, कोषाध्यक्ष उल्हास शिरसाठ, मविप्र केपिजे कॉलेजचे प्राचार्य पी.आर. भाबड, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कांगणे, तालुका संघटक सुनील पहाडे उपस्थित होते.
इगतपुरी : मविप्रच्या कर्मवीर आमदार पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक पंधरवड्यानिमित्त कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे नाशिक विभागीय अध्यक्ष अरुण भार्गवे, जिल्हाध्यक्ष सुधीर काटकर, जिल्हा सचिव सुरेशचंद्र धारणकर, महानगर संघटक प्रशांत देशमुख, कोषाध्यक्ष उल्हास शिरसाठ, मविप्र केपिजे कॉलेजचे प्राचार्य पी.आर. भाबड, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कांगणे, तालुका संघटक सुनील पहाडे उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद, ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विभागीय अध्यक्ष भार्गवे यांनी ग्राहक संरक्षण कायदा,अपिल,जिल्हा न्याय मंच कार्यपद्धतीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान प्रशांत देशमुख यांनी ग्राहक न्याय मंचाच्या निवडक निकालाचे वाचन करून माहिती दिली.गोपाळ शिंदे, सदस्य प्रमोद बेलेकर, शशांक सोनवणे
यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक आशिष सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन उत्तम सांगळे यांनी केले. आभार संघटक सुनील पहाडे यांनी मानले.