अभोणा महाविद्यालयात अर्थशास्त्राची राष्ट्रीय परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:34 PM2018-02-13T23:34:09+5:302018-02-13T23:51:25+5:30
अभोणा : येथील डांग सेवा मंडळ संचलित कला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘आदिवासी बेरोजगारी’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
अभोणा : येथील डांग सेवा मंडळ संचलित कला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘आदिवासी बेरोजगारी’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता व सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बीडकर, सचिव मृणाल जोशी, उपाध्यक्ष अण्णासाहेब मराठे, शेखर जोशी, प्राचार्य डॉ. आर. बी. टोचे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एस. आर. निकम यांनी प्रास्ताविक केले. परिषदेत प्रा. डॉ. सुहास आव्हाड, डॉ. डी. आर. बच्छाव, डॉ. एस. के. मगरे, पंकज अहिरे, डॉ. एस. डी. श्रीवास्तव, डॉ. एस. के. पगार, डॉ. सुनील घुगे, डॉ. डी. आर. पताडे, डॉ. एस. के. मुठाळ, प्राचार्य डॉ. हरीश आडके यांनी मार्गदर्शन केले. आदिवासींमधील बेरोजगारीची कारणे व त्यावरील उपाय-योजना या विषयावर चर्चा करण्यात आली.