राष्टÑीय आदर्श शिक्षक पुरस्कार : ताकाटे, धारराव, शिंदे सन्मानित जिल्ह्यात तिघांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 11:43 PM2017-09-07T23:43:56+5:302017-09-08T00:11:25+5:30

मनुष्यबळ विकास व मानव संसाधन मंत्रालयामार्फत दिले जाणारे राष्ट्रीय पातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते जिल्ह्यातील निफाड येथील अर्जुन ताकाटे व सुरेश धारराव, तर शिलापूर (ता.नाशिक) येथील प्रदीप शिंदे यांना दिल्ली येथे प्रधान करण्यात आले.

National Ideal Teacher Award: Takate, Dhararao, Shinde honored in the district, honors the trio | राष्टÑीय आदर्श शिक्षक पुरस्कार : ताकाटे, धारराव, शिंदे सन्मानित जिल्ह्यात तिघांचा गौरव

राष्टÑीय आदर्श शिक्षक पुरस्कार : ताकाटे, धारराव, शिंदे सन्मानित जिल्ह्यात तिघांचा गौरव

Next

निफाड : मनुष्यबळ विकास व मानव संसाधन मंत्रालयामार्फत दिले जाणारे राष्ट्रीय पातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते जिल्ह्यातील निफाड येथील अर्जुन ताकाटे व सुरेश धारराव, तर शिलापूर (ता.नाशिक) येथील प्रदीप शिंदे यांना दिल्ली येथे प्रधान करण्यात आले. यावेळी मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, सचिव अनिल स्वरूप उपस्थित होते. देशात ३१९ शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्टÑातील २५ शिक्षकांचा समावेश आहे.
आहेरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक अर्जुन ताकाटे यांना नाशिक जिल्ह्यातील एकमेव पुरस्कार मिळाला आहे, तर राज्यातील अपंग शिक्षकांसाठीचा पुरस्कार जिल्ह्यातीलच निफाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १चे शिक्षक सुरेश धारराव यांना मिळाला आहे.
अर्जुन ताकाटे यांनी एम.फील. बी.एड. संगीत क्षेत्रातील पारंगत पदवी संपादन केली आहे. प्राथमिक शिक्षणात भरीव कामगिरी बजावली आहे. डिजिटल शाळा, ज्ञानरचनावाद, शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष योगदान दिले आहे. मूळचे निफाड तालुक्यातील कारसूळ येथील ताकाटे यांनी गीत मंचच्या माध्यमातून काम केले आहे. राज्यातून अपंग शिक्षकासाठी एक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सुरेश धारराव यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. वंचित घटकांच्या मुलांसाठी कार्य धारराव यांनी केले आहे. शिलापूर शाळेतील प्रदीप शिंदे यांनी ज्ञानरचनावाद, शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष योगदान दिले आहे.

Web Title: National Ideal Teacher Award: Takate, Dhararao, Shinde honored in the district, honors the trio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.