राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा  सुधारीत वेळापत्रकानुसार 16 जूनला होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 06:20 PM2019-04-26T18:20:26+5:302019-04-26T18:23:41+5:30

हावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर प्रथम टप्प्यातील राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा झाल्यानंतर यातून निवड झालेले विद्यार्थी राष्ट्रीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) परीक्षेसाठी पात्र होतात. या परीक्षेच्या वेळापत्रकात लोकसभा निवडणुकीमुळे बदल करण्यात आला असून, आता ही परीक्षा १२ मे २०१९ ऐवजी नवीन वेळापत्रकानुसार १६ जून २०१९ रोजी होणार आहे. 

National Intelligence Examination will be held on 16th of the revised schedule | राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा  सुधारीत वेळापत्रकानुसार 16 जूनला होणार 

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा  सुधारीत वेळापत्रकानुसार 16 जूनला होणार 

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या वेळापत्रकात बदलनवीन वेळापत्रकानुसार 16 जूनला परीक्षा

नाशिक : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर प्रथम टप्प्यातील राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा झाल्यानंतर यातून निवड झालेले विद्यार्थी राष्ट्रीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) परीक्षेसाठी पात्र होतात. या परीक्षेच्या वेळापत्रकात लोकसभा निवडणुकीमुळे बदल करण्यात आला असून, आता ही परीक्षा १२ मे २०१९ ऐवजी नवीन वेळापत्रकानुसार १६ जून २०१९ रोजी होणार आहे. 
लोकसभा निवडणुकीमुळे विविध परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, दुसऱ्या टप्प्यातील राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षाही निवडणुकांमुळे प्रभावित झाली आहे. या परीक्षेसाठी पहिल्या टप्प्यातील राज्यस्तरीय परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड झाली असून, संबंधित निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एन.सी.ई.आर.टी.तर्फे  एनटीएससाठी राज्यातून ३८७ विद्यार्थी कोटा होता. त्यानुसार निवडण्यात आलेल्या ३८७ विद्यार्थ्यांची निवड यादी १ मार्च रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली असून, एन.सी.ई.आर.टी.तर्फे  महाराष्ट्रासाठी २०१८-१९ व सन २०१९-२० साठी सुधारित कोटा ७७४ विद्यार्थी इतका वाढविण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वसाधारण गटातील ३९१, इतर मागास वर्गीय संवगार्तील २०९, अनुसूचित जाती ११६ व अनुसूचित जमाती ५८ अशा एकूण ७७४ विद्यार्थ्यांचा कोटा आहे. संबंधित संवर्गातील समान गुणांचे विद्यार्थी समाविष्ट करून ७७५ विद्यार्थ्यांची निवड यादी www.mscepune.in व http://nts.mscescholarshipexam.in  या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. 

Web Title: National Intelligence Examination will be held on 16th of the revised schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.