राष्टय रोइंगपटूवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 01:12 AM2019-05-16T01:12:08+5:302019-05-16T01:12:38+5:30

तंबाखू खाण्यासाठी रोइंगपटू निखिल सोनवणे यास तिघा संशयित हल्लेखोरांनी मंगळवारी (दि.१४) रात्री नऊ वाजेच्या सुमारास हनुमानवाडी-मखमलाबाद लिंकरोडवरील पेट्रोलपंपाच्या वळणावर थांबवून धारदार शस्त्राने हल्ला चढविला.

 National Ringtones Attack on Assault | राष्टय रोइंगपटूवर प्राणघातक हल्ला

राष्टय रोइंगपटूवर प्राणघातक हल्ला

googlenewsNext

नाशिक : तंबाखू खाण्यासाठी रोइंगपटू निखिल सोनवणे यास तिघा संशयित हल्लेखोरांनी मंगळवारी (दि.१४) रात्री नऊ वाजेच्या सुमारास हनुमानवाडी-मखमलाबाद लिंकरोडवरील पेट्रोलपंपाच्या वळणावर थांबवून धारदार शस्त्राने हल्ला चढविला. या हल्ल्यात निखिल गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघा अल्पवयीन संशयितांसह दीपक सुखदेव डगळे (२१, रा. मोरे मळा) यास अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निखिल भाऊसाहेब सोनवणे असे या खेळाडूचे नाव असून, तो लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे गोदापार्कजवळील वॉटर स्पोर्ट्स क्लबवर रोइंग या नौकानयन जलक्रीडा प्रकाराचा सराव करण्यासाठी सायंकाळी गेला होता. सराव आटोपून तो सायकलवरून क्रांतीनगर येथील बाफणा चाळीकडे जात असताना हनुमानवाडी लिंकरोडच्या वळणावर डगळे यासह दोघा अल्पवयीन हल्लेखोरांनी त्यास अडविले. ‘तंबाखू दे’ असे सांगून त्याच्याशी वाद घातला. दरम्यान, त्याने तंबाखू खात नसल्याचे सांगितल्यानंतर मनात राग धरून त्याची लूट करण्याच्या उद्देशाने तिघांनी त्यास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
स्पर्धेला मुकणार; सरावावर पाणी
येत्या शुक्रवारपासून पुणे येथील नाशिक फाट्याजवळील आर्मी बोटिंग क्लब येथे राज्यस्तरीय रोर्इंग स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची तयारी निखिल करत होता. मागील अनेक महिन्यांपासून तो गोदापात्रात नौकानयन करत घाम गाळत होता; मात्र या तिघा हल्लेखोरांनी त्याच्या मेहनतीवर पाणी फिरविले असून, त्याला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुकावे लागण्याची शक्यता आहे.

Web Title:  National Ringtones Attack on Assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक