आरटीओ अधिकारी ऑल इंडिया फेडरेशनला राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:14 AM2021-01-23T04:14:27+5:302021-01-23T04:14:27+5:30
नाशिक : देशभरात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. ...
नाशिक : देशभरात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर संरणक्षमंत्री राजनाथ सिंह व रस्ते परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रस्ता सुरक्षेसंदर्भात उत्कृष्ट कामगिरीसाठी आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मोटार वाहन विभागातील तांत्रिक कार्यकारी अधिकारी संघटनेला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, या सोहळ्यात नाशिकचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा संघटनेचे सरचिटणीस वासुदेव भगत यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे रंगलेल्या या सत्कार सोहळ्यात ऑल इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष अशफाक अहमद (कर्नाटक), सरचिटणीस वासुदेव भगत (महाराष्ट्र), कोषाध्यक्ष संपतकुमार (तामिळनाडू) जनसंपर्क अधिकारी सचिन बोधले (महाराष्ट्र) आणि महाराज सिंह (दिल्ली) यांना राजनाथसिंह व नितीन गडकरी यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय महासंघाचे २८ राज्य व केंद्र शासितप्रदेशचे आरटीओ अधिकारी संघटना सदस्य असून, देशभरातील राज्य संघटनांच्या मदतीने रस्ते सुरक्षा उपक्रम "सडक सुरक्षा जीवन रक्षा " राबवित असल्याची माहिती यावेळी महासंघाचे अध्यक्ष अहमद व मुख्य सचिव वासुदेव भगत यांनी दिली.
(आरफोटो- २२ आरटीओ) नाशिकचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांना राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करताना केंद्रीय संरणक्षमंत्री राजनाथ सिंह व रस्ते परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी.