सिन्नर, ठाणगाव येथे राष्टÑीय विज्ञान दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:58 PM2018-03-03T23:58:24+5:302018-03-03T23:58:24+5:30

सिन्नर : शहर व तालुक्यात राष्टÑीय विज्ञान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

National Science Day in Sinnar, Thangaon | सिन्नर, ठाणगाव येथे राष्टÑीय विज्ञान दिन

सिन्नर, ठाणगाव येथे राष्टÑीय विज्ञान दिन

googlenewsNext
ठळक मुद्देविज्ञान दिनाविषयी माहिती डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन

सिन्नर : शहर व तालुक्यात राष्टÑीय विज्ञान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामाजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात राष्टÑीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य व्ही. एस. कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला के. एस. कापडणीस, वाय. एम. रुपवते, एल. बी. वायळ, जी. एस. पावडे उपस्थित होते. शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थिनी दीपाली शिंदे, गायत्री काकड, अमृता जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. के. एस. कापडणीस, सांस्कृतिक विभागप्रमुख पी. बी. थोरात यांनी विज्ञान दिनाविषयी माहिती देताना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला जाऊन आपल्या आवतीभोवती घडणाºया घटना आपल्या जीवनाशी कशा संबंधित आहे याचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. पी. बी. थोरात यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धी शिंदे हिने आभार मानले. राष्टÑीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून डुबेरे येथील जनता विद्यालयात विज्ञानशिक्षक पी. आर. करपे यांनी विद्यालयातील विज्ञान छंद मंडळातील सदस्य व विद्यार्थ्यांना ९० प्रात्यक्षिके करून दाखविली. मुख्याध्यापक एस. सी. रहाटळ यांनी प्रात्यक्षिकातून साजरा केलेल्या विज्ञान दिनाचे कौतुक केले. यावेळी बी. व्ही. कडलग, बी. एम. वारुंगसे, इ. ए. खैरनार, एस. एन. पगार, डी. ए. रबडे, आर. बी. बोडके, एन. बी. खुळे, एम. पी. रोडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: National Science Day in Sinnar, Thangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.