बाळू जुंदरे याची कुस्तीत देशपातळीवर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 07:05 PM2021-03-24T19:05:00+5:302021-03-24T19:07:09+5:30
कवडदरा : कुस्ती स्पर्धेत देशपातळीवर निवड झालेल्या भरविरखुर्दच्या बाळू जुंदरे याचा कवडदरा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कवडदरा : कुस्ती स्पर्धेत देशपातळीवर निवड झालेल्या भरविरखुर्दच्या बाळू जुंदरे याचा कवडदरा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
इगतपुरी तालुक्यातील भारत सर्व सेवा संघाचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनियर कॉलेज मधील गुरु हनुमान आखाडा साकूरफाटा या आखाड्यातील कुस्तीपट्टू व भरविर खुर्दचा भूमिपुत्र पहिलवान बाळू शिवाजी जुंदरे याने पुणे येथे (मामासाहेब मोहळ तालीमसंघ) झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनियर कुस्ती स्पर्धेतील ६५ किलो वजनी गटात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच बाळूची २ ते ४ एप्रिल रोजी नोएडा (उत्तरप्रदेश ) येथे होणार्या देश पातळीवरील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कुस्ती या अस्सल देशी क्रिडा प्रकारात कवडदरा विद्यालय तसेच भरविर खुर्द गांवचे नांव महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर अखिल भारतात पोहोचवणार्या पहिलवान बाळू जुंदरे याचा त्यानिमीत्त कवडदरा विद्यालयात अभिनंदन व सत्कार प्राचार्य कचेश्वर मोरे यांच्या हस्ते विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच दत्तू पाटील जूंदरे, सुभाष फोकणे, रमेश निसरड, संपत रोंगटे, भाऊराव रोंगटे, किरण रोंगटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.