हिंदी भाषा दिनानिमित्त येवला महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:19 AM2021-09-16T04:19:38+5:302021-09-16T04:19:38+5:30
उद्घाटन विकास समितीचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. व्ही. एस. मोरे यांच्या हस्ते झाले. त्यांच्या हस्ते निवडक शोधनिबंधांच्या विशेषांकाचे प्रकाशन ...
उद्घाटन विकास समितीचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. व्ही. एस. मोरे यांच्या हस्ते झाले. त्यांच्या हस्ते निवडक शोधनिबंधांच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते. चर्चासत्रात रायपूर, छत्तीसगड येथील डॉ. आरती पाठक व अहमदाबाद येथील डॉ. गेलजी भाई भाटिया यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अनिता नेरे यांनी प्रास्ताविक केले. परिचय कार्यक्रमाचे संयोजक तथा हिंदी विभागप्रमुख डॉ. रघुनाथ वाकळे यांनी करून दिला. प्रा. कैलास बच्छाव यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन महात्मा गांधी विद्यामंदिर हिंदी अभ्यास मंडळ अध्यक्षा तथा हरसुल महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख डॉ. पूनम बोरसे यांनी केले. कार्यक्रमात देशभरातून सत्तर प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. या चर्चासत्रासाठी आलेल्या निवडक शोधनिबंधांना रिसर्च जर्नी या आंतरराष्ट्रीय शोध नियतकालिकाच्या विशेषांकातून प्रकाशित करण्यात आले आहे. गुगल मीट ॲपवरील या चर्चासत्रासाठी डॉ. गौतम कोलते यांचे तांत्रिक साहाय्य लाभले.