देशवंडी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 03:21 PM2019-01-13T15:21:51+5:302019-01-13T15:22:16+5:30
नायगाव - सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उद् घाटन पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे यांच्या हस्ते करण्यात आले. धनलक्ष्मी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवाजी कातकाडे अध्यक्षस्थानी होते.
नायगाव - सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उद् घाटन पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे यांच्या हस्ते करण्यात आले. धनलक्ष्मी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवाजी कातकाडे अध्यक्षस्थानी होते. पंचायत समिती सदस्य संग्राम कातकाडे,सरपंच विनता कापडी,उपसरपंच सुभाष बर्के,चिंधु डोमाडे, कुणाल कातकाडे, . के.व्ही.रेड्डी, सी.जे.भंगाळे,यादव कापडी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. * सात दिवस चाललेल्या श्रम संस्कार शिबिरात देशवंडीतील लोककवी वामनदादा कर्डक स्मारक परिसरात स्वच्छता करण्यात आली. शिवारात जलसंधारण योजने सारखे अनेक मातीचे बांधारे श्रमदानातुन तयार केले.तसेच बेटी बचाओ बेटी पढावो,अंधश्रध्दा आदी विषयांवर नाटीका सादर करून ग्रामस्थांचे प्रबोधन केले.या शिबिरात एस.एस.के विद्यालय नायगाव ,सर विश्वेश्वराय विद्यालय व औषध निर्माण शाखा पदवी महाविद्यालय चिंचोली आदी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रमदान केले.