राष्टÑीय युनानी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:50 AM2018-02-17T00:50:27+5:302018-02-17T00:50:40+5:30
पहिला ‘राष्टÑीय युनानी दिवस’ मालेगावच्या तिब्बीया युनानी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने तीन दिवसीय कार्यक्रम झाले.
संगमेश्वर : पहिला ‘राष्टÑीय युनानी दिवस’ मालेगावच्या तिब्बीया युनानी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने तीन दिवसीय कार्यक्रम झाले. युनानीचे संस्थापक पैगंबरवासी मसिहुल मुलक हकीम अजमल खानसाहेब यांचा जन्मदिवस हा राष्टÑीय युनानी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. युनानी महाविद्यालयाच्या वतीने मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी, कौळाणे (निं.) आदी ठिकाणी आरोग्य जनजागृती शिबिर घेण्यात आले. युनानी महाविद्यालयातील डॉक्टर्स सय्यद मिनहाज, डॉ. मोहंमद जुबैर, डॉ. अबुल इरफान, डॉ. वसीम यांनी ग्रामपंचायत विविध आजारासंबंधी माहिती देऊन त्यासंबंधी उपचार, औषधे व घ्यावयाची काळजी यावर सखोल मार्गदर्शन केले. ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन केले. मन्सुरा महाविद्यालयाच्या रुग्णालयात मोफत सर्वरोगनिदान शिबिर घेऊन रुग्णांवर उपचार करण्यात आले. १५० रुग्णांनी यात सहभाग घेतला. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी निबंध व वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या. प्राचार्य डॉ. शाहेरा रहेमानी, उपप्राचार्य डॉ. ह्याह्याखान, डॉ. सलीम फैजी, डॉ. अफीया नरगीस, डॉ. शाकीर, डॉ. अक्रम, डॉ. अर्शद जमाल आदी यावेळी उपस्थित होते.