राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:33 AM2019-01-26T00:33:23+5:302019-01-26T00:33:42+5:30

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात आली.

 National voters celebrate the day with enthusiasm | राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा

राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा

googlenewsNext

नाशिक : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात आली.
यावेळी बोलताना खेडकर म्हणाले, भारतीय लोकशाही जगातील उत्तम लोकशाही व्यवस्था आहे. आपली लोकशाही मूल्ये जगासाठी आदर्श आहेत. ही व्यवस्था वृद्धींगत करण्याचे श्रेय मतदार नोंदणीसाठी उत्तम काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाºाांना आहे. नागरिकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मतदान करावे, तसेच पात्र मतदारांनी मतदार नोंदणी केली नसल्यास त्वरीत करावी, असे आवाहन त्यांनी केले. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले. नवमतदार नोंदणीत जिल्ह्याने चांगली कामगिरी केली असून, केंद्र अधिकाºयांनी चांगले काम केल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मतदार नोंदणीत उत्तम कामगिरी करणाºया नायब तहसीलदार आणि बीएलओंचा सत्कार करण्यात आला. मतदार दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान कासार, उपजिल्हाधिकारी दीपमाला चौरे, स्वाती थवील, तहसीलदार गणेश राठोड, शरद घोरपडे, रचना पवार, अभिलाषा देवगुणे आदी उपस्थित होते.
नावनोंदणीचे आवाहन
नवमतदारांना प्रातिनिधिक स्वरूपात मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मतदार नोंदणीचे आवाहन करणारे पथनाट्य सादर केले.

Web Title:  National voters celebrate the day with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.