सिन्नर तालुक्यात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 05:24 PM2019-01-29T17:24:15+5:302019-01-29T17:27:04+5:30
सिन्नर तालुक्यातील विविध महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रभातफेरी, पाथनाट्य सादर करण्यात आले. मतदारांचे प्रबोधन करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदारदिन साजरा करण्यात आला. यावेळी तहसीलदार नितीन गवळी, पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सिन्नर महाविद्यालय, शेठ ब. ना. सारडा, आरंभ विद्यालय व महात्मा फुले विद्यालय, जनता विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी महात्मा फुले पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढली. मतदान व मतदाराचे महत्व पटवून देण्यात आले. मतदार दिनानिमित्त झालेल्या स्पर्धेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते निवडणूक आयोग व महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. पाथरे हायस्कूल व एस. जी. ज्युनिअर कॉलेज येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रभात फेरी काढून प्रबोधन करण्यात आले. प्राचार्य पी. एन. रानडे, पर्यवेक्षक एन. एस. कानस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी साक्षर जनता-भूषण भारता, मतदार राजा जागा हो- लोकशाहीचा धागा हो, छोडकर सारे काम- चलो करे मतदान आदी प्रकारच्या घोषना देण्यात आल्या. गावातून प्रबोधन प्रभात फेरी काढली. यात पाथरे बुद्रुकचे सरपंच मधुकर नरोडे, माजी सरपंच भाऊसाहेब नरोडे, माजी सरपंच मच्छीन्द्र चिने, संपत चिने आदी मान्यवर सामील झाले होते. प्रभात फेरीचे नेतृत्व युवराज सोनवणे, प्रसन्न काळे, अजिंक्य नरोडे, मयूर चिने, सीमा बर्डे, शालिनी नरोडे, पूजा वाघ, साक्षी भवर, तेजिस्वनी चीने आदींनी केले. सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस मतदार जनजागृती फेरी काढून व ठिक ठिकाणी मतदार जनजागृती नाटिका सादर करत साजरा करण्यात आला. भोर विद्यालयाचे प्राचार्य व्ही.एस. कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्र मास जिल्हा परिषद सदस्य वनिता शिंदे, सरपंच सीमा शिंदे, शेखर कर्डिले, बी. बी. पगार, एस. एस. शेणकर, एस. ओ. सोनवणे, डि.बी. दरेकर, आर. सी. काकड, एल. बी. वायाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.