मालेगावी केबीएच विद्यालयात राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:30 AM2020-12-14T04:30:08+5:302020-12-14T04:30:08+5:30
पाटणे : मालेगाव कॅम्पातील केबीएच विद्यालयात एनटीएस परीक्षा सुरळीत पार पडली. ३६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...
पाटणे : मालेगाव कॅम्पातील केबीएच विद्यालयात एनटीएस परीक्षा सुरळीत पार पडली. ३६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. लाॅकडाऊननंतर विद्यार्थी प्रथमच शाळेत आल्याने शाळेची घंटा वाजल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (दि.१३) केबीएच विद्यालयाच्या केंद्रावर (३१११) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेसाठी (एनटीएस) मराठी माध्यम -१७४ विद्यार्थी, इंग्रजी माध्यम- १२३ विद्यार्थी, उर्दू माध्यम-९७ असे एकूण ३९४पैकी ३६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ३० विद्यार्थी या परीक्षेत अनुपस्थित असल्याची माहिती केंद्र संचालक प्राचार्य एस. एस. पवार व उपकेंद्र संचालक व्ही.एस. पगार यांनी दिली.
केबीएच विद्यालय या केंद्रात सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळेत बौद्धिक क्षमता चाचणी, तर दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत शालेय क्षमता चाचणी असे शंभर गुणांचे दोन पेपर घेण्यात आले. परीक्षा सुरळीतपणे पार पडली. परीक्षा केंद्राला गटशिक्षणाधिकारी साहेबराव वाघ यांनी भेट देऊन पाहणी केली. केंद्रांवर थर्मामीटर, थर्मल स्कॅनर ,पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी आदी वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करून परीक्षा सुरळीतपणे पार पडली.
एनटीएस परीक्षेत इयत्ता दहावीत शिकत असलेले विद्यार्थी यासाठी पात्र असतात. प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना अधिकाधिक विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. परीक्षेचे कामकाज केंद्र संचालक ए.एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र संचालक व्ही .एस. पगार, आर.डी .शेवाळे, एच .एन. सोनवणे, एम. आर.आहिरे यांनी बघितले.