राष्टÑीय योग स्पर्धा : ८८ वर्षीय कुलकर्णी यांनी मिळवले विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:47 AM2017-09-04T00:47:29+5:302017-09-04T00:47:37+5:30

राष्ट्रीय योगा फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र योगा कल्चर असोसिएशन आणि नाशिक योगा कल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकला घेण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्पर्धकांनी बाजी मारली आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

National Yoga Tournament: 88-year-old Kulkarni won the championship | राष्टÑीय योग स्पर्धा : ८८ वर्षीय कुलकर्णी यांनी मिळवले विजेतेपद

राष्टÑीय योग स्पर्धा : ८८ वर्षीय कुलकर्णी यांनी मिळवले विजेतेपद

Next

सातपूर : राष्ट्रीय योगा फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र योगा कल्चर असोसिएशन आणि नाशिक योगा कल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकला घेण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्पर्धकांनी बाजी मारली आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्र योगा कल्चर असोसिएशन आणि नाशिक योगा कल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकला नक्षत्र लॉन्स येथे पहिली राष्ट्रीय योगा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा सहा ते ८० वयोगटातील स्पर्धकांसाठी घेण्यात आली. या स्पर्धेत विविध १८ राज्यांतील ९२२ स्पर्धक सहभागी झाले होते. ५३ राष्ट्रीय योगपंचांनी परीक्षणाचे काम पाहिले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा समारोप खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जागतिक सुंदरी नमिता कोहोक, तसेच नाशिक योगा कल्चरचे अध्यक्ष डॉ. यू. के. शर्मा, उपाध्यक्ष व्हिनस वाणी, प्रज्ञा पाटील, सुरेश गांधी, गौरव केदारे, संतोष मिश्रा, वंदना रकिबे, मिलिंद तारे, उदय रकिबे, डॉ. मीनाक्षी गवळी, रेणुका मराठे, सुनील आहेर, गौरंगी पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: National Yoga Tournament: 88-year-old Kulkarni won the championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.