राष्टÑवादी कॉँग्रेसपुढे दिंडोरीचे त्रांगडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:42 AM2019-03-13T01:42:03+5:302019-03-13T01:42:35+5:30

जागा वाटपात राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वाट्याला असलेल्या दिंडोरी मतदारसंघातून डॉ. भारती पवार की धनराज महाले या दोघांच्या नावावर पक्षात एकमत होत नसताना त्यातच मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने या जागेवर दावा सांगितल्यामुळे राष्टÑवादीपुढे त्रांगडे उभे राहिले आहे. अशातच भारती पवार यांना उमेदवारी नाकारल्यास त्यांच्याकडून वेगळा विचार होण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे विजयाची शक्यता बाळगून असलेली राष्ट्रवादी कॉँग्रेस पेचात सापडली आहे.

Nationalist Congress party ahead of Dindori! | राष्टÑवादी कॉँग्रेसपुढे दिंडोरीचे त्रांगडे !

राष्टÑवादी कॉँग्रेसपुढे दिंडोरीचे त्रांगडे !

Next
ठळक मुद्देएकमत नाही : उमेदवार ठरेना, जागेचा प्रश्न सुटेना

नाशिक : जागा वाटपात राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वाट्याला असलेल्या दिंडोरी मतदारसंघातून डॉ. भारती पवार की धनराज महाले या दोघांच्या नावावर पक्षात एकमत होत नसताना त्यातच मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने या जागेवर दावा सांगितल्यामुळे राष्टÑवादीपुढे त्रांगडे उभे राहिले आहे. अशातच भारती पवार यांना उमेदवारी नाकारल्यास त्यांच्याकडून वेगळा विचार होण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे विजयाची शक्यता बाळगून असलेली राष्ट्रवादी कॉँग्रेस पेचात सापडली आहे.
सध्या भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण या मतदारसंघाचे गेल्या तीन टर्मपासून प्रतिनिधित्व करीत आहेत. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेतही डॉ. भारती पवार यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसकडून त्यांना कडवी लढत दिली होती. त्यामुळे त्याचवेळी उमेदवारी करतील अशी अटकळ पक्षाचे कार्यकर्ते व खुद्द भारती पवारदेखील बाळगून होत्या. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्टÑवादीची ताकद वाढण्यास मदत झाली, परंतु उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झाला. भाजपा-सेनेची युती होणार हे गृहीत धरून महाले यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये उमेदवारीच्या उद्देशाने प्रवेश केला आहे. त्यांचे वडील स्व. हरिभाऊ महाले यांनी जनता दलाकडून आताच्या दिंडोरी व पूर्वीच्या मालेगाव नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले असल्याने त्यांच्या पुण्याईने निवडणूक सोपी जाण्याची महाले यांची योजना असली तरी, राष्टÑवादी कॉँग्रेस अद्यापही उमेदवार निश्चित करू शकलेली नाही. विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याविषयी मतदारांची असलेली नकारात्मकता पक्षाने सर्व्हे करून जाणून घेतल्यामुळे त्यांनाच भाजपाकडून उमेदवारी दिली जाईल याची शाश्वती नसली तरी, भाजपा अन्य सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. अशा वेळी भारती पवार यांना भाजपाकडून गळाला लावण्याचा प्रयत्न नाकारता येणार नाही.
उमेदवारीबाबत सावध पावले
राष्टÑवादी कॉँग्रेसदेखील उमेदवार जाहीर करण्याबाबत सावध पावले टाकत असताना मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने दिंडोरीच्या जागेवर दावा सांगून राष्टÑवादीपुढे पेच निर्माण केला आहे. सुरगाणा-कळवण मतदारसंघाचे आमदार जिवा पांडू गावित हे पक्षाचे उमेदवार असतील असे पक्षाने जाहीरही करून टाकले आहे. त्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसला एकीकडे स्वपक्षातील पेच मिटविण्याबरोबरच, माकपाची समजूत काढण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

Web Title: Nationalist Congress party ahead of Dindori!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.