लोकहितवादी मंडळाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा मानपत्र देऊन सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 03:49 PM2022-07-31T15:49:36+5:302022-07-31T15:50:49+5:30

साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असेल तर यासाठी नाशिककरांच्या वतीने स्वागत असेल असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

nationalist congress party leader chhagan bhujbal has been honored by the lokhitwadi mandal | लोकहितवादी मंडळाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा मानपत्र देऊन सन्मान

लोकहितवादी मंडळाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा मानपत्र देऊन सन्मान

googlenewsNext

नाशिक: लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, नाशिक महानगपालिका आणि समस्त नाशिककरांचा हातभार लागल्याने नाशिकमध्ये पार पाडलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी झाले आहे. पुन्हा जर साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असेल तर यासाठी नाशिककरांच्या वतीने स्वागत असेल असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिकच्या मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे पार पडलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी नियोजन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्याबद्दल भुजबळ फार्म येथील कार्यालयात आज ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक असलेल्या लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून छगन भुजबळ यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सर्वांनी मेहनत घेतली त्या सर्वांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. साहित्य संमेलनात नाशिककरांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांमुळे नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यासाठी नाशिकच्या जनतेचे आभार मानावे तितकेच कमी असल्याचे सांगत पुन्हा नाशिकला संमेलन होणार असल्यास नाशिककरांच्या वतीने स्वागतच असेल असे त्यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, डॉ.प्रशांत पाटील, भगवान हिरे, प्रा. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, किरण समेळ, फणिंद्र मंडलिक, चंद्रकांत दिक्षित, मुक्ता बालिका, अपूर्वा सौचे,  सागर पाटील, आदित्य समेळ, विक्रम सोनवणे, तेजस कुलकर्णी, अमोल जोशी, अजिंक्य कुलकर्णी यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Web Title: nationalist congress party leader chhagan bhujbal has been honored by the lokhitwadi mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.