विद्यार्थ्यांच्या समस्यांविषयी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ब्रम्हावॅलीस निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:25+5:302021-06-02T04:12:25+5:30

नाशिक : अंजनेरी त्र्यंबकेश्वर भागातील ब्रम्हावॅली फार्मसी महाविद्यालयाच्या गैरसोयीच्या वेळापत्रकासोबतच विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि ...

Nationalist Congress Party's Brahmavalis statement on student issues | विद्यार्थ्यांच्या समस्यांविषयी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ब्रम्हावॅलीस निवेदन

विद्यार्थ्यांच्या समस्यांविषयी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ब्रम्हावॅलीस निवेदन

Next

नाशिक : अंजनेरी त्र्यंबकेश्वर भागातील ब्रम्हावॅली फार्मसी महाविद्यालयाच्या गैरसोयीच्या वेळापत्रकासोबतच विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या समस्यांविषयी महाविद्यालय प्रशासनाला मंगळवारी (दि. १) निवेदन दिले आहे. महाविद्यालयाचे अनुचित वेळापत्रक आणि द्वितीय वर्षाच्या बी-फार्मसीच्या विद्यार्थ्यांसमोरील समस्यांबाबत प्राचार्य विजय वाघ यांना दिलेल्या निवेदनातून विद्यार्थ्यांच्या समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

कोरोना संकट काळात विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणात व्यस्त असताना काही विद्यार्थ्यांना अनुचित वेळापत्रकासह विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचे नमूद करीत विद्यार्थ्यांना योग्य वेळापत्रक मिळत नाही. एक सत्र परीक्षा संपताच महाविद्यालयाने पुढील सेमिस्टरची परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. या विषयांचा विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नाही. काही विषयांसाठी केवळ काही अतिथी व्याख्यात्यांची व्यवस्था केली जाते, अशा प्रकारच्या तक्रारी असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, उपाध्यक्ष रमीज पठान यांनी प्राचार्य विजय वाघ यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच विद्यार्थ्यांना योग्य वेळापत्रक दिले जावे आणि विद्यापीठाच्या शैक्षणिक नियम व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याची मागणीही यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली.

===Photopath===

010621\01nsk_33_01062021_13.jpg

===Caption===

 ब्रम्हावॅली फार्मसी महाविद्यालय प्रशासनास निवेदन देताना  

Web Title: Nationalist Congress Party's Brahmavalis statement on student issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.